Anushka Sharma Mobile Wallpaper: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आरसीबीच्या विजयानंतर पती विराट कोहलीसोबत (Virat Kohli) सेलिब्रेशन करताना ती चर्चेत आली होती. या सेलिब्रेशननंतर विराट आणि अनुष्का कारमध्ये बसत असताना पापाराझींना अनुष्काचं मोबाईलमधील वॉलपेपर दिसलं. या वॉलपेपरने सगळ्यांचाच लक्ष वेधून घेतलं. तिच्या फोनच्या वॉलपेपरवर ना विराटचा फोटो होता ना तिच्या मुलांचा. एका विशेष व्यक्तीचा फोटो तिने मोबाईलच्या वॉलपेपरवर लावल्याने त्या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
अनुष्का शर्माचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.विमानतळाबाहेर विराट आणि अनुष्का दोघेही स्पॉट झाले होते. या व्हिडिओमध्ये ती गाडीत बसताना दिसतेय. तिच्या हातातील फोनचा डिस्प्ले ऑन झालेला दिसतो. त्याचवेळी तिचा वॉलपेपर पापाराझींना दिसला. या वॉलपेपरवर तिने प्रसिद्ध संत प्रेमानंदजी महाराज यांचा फोटो लावला होता. अलीकडेच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स ला पराभूत करत आयपीएल 2026 चे विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर विराट आणि अनुष्का दोघांनीही प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतलेलं. अनुष्का शर्मा संत प्रेमानंदजी महाराज यांना मानते हे सगळ्यांनाच माहीत आहे.
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी विराट कोहलीचा फोनचा वॉलपेपरही व्हायरल झाला होता. त्यावर बाबा नीम करोली यांचा फोटो होता. विराट आणि अनुष्का दोघेही अध्यात्मिक वातावरणात रमतात. अनेकदा धार्मिक स्थळांना, मंदिरांना आणि आश्रमांमध्ये भेटी देताना ते दिसतात.अनुष्का शर्मा अध्यात्माकडे ओढ असलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रेमानंद महाराजांबरोबरचे तिचे संवाद, गळ्यातील तुळशीची माळ आणि जप यामुळे तिची श्रद्धा अनेकदा चर्चेत आली आहे. नुकतंच विराट कोहलीच्या विजयानंतर अनुष्का त्याच्यासह प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी गेली होती. त्यावेळचे दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.