Actress Dance : प्रसिद्ध अभिनेत्री लोकल ट्रेनमध्ये थिरकली; 'लाल लाल कलरची बांगडी...' गाण्यावर केला भन्नाट डान्स, VIDEO आला समोर
Saam TV June 03, 2026 06:45 PM

प्रसिद्ध अभिनेत्री लोकल ट्रेनमध्ये थिरकली

'लाल लाल कलरची बांगडी...' गाण्यावर केला भन्नाट डान्स

व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर संजू राठोडचे 'लाल लाल कलरची बांगडी...' हे गाणे तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेक डान्स रील बनवल्या जात आहे. मोठे असो वा लहान सर्वचजण या गाण्याचा आनंद घेत आहे. अनेक कलाकारांनी देखील या गाण्यावर भन्नाट डान्स रील बनवल्या आहेत. अशात आता टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकर 'लाल लाल कलरची बांगडी...' गाण्यावर थिरकली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने चक्क मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हा भन्नाट डान्स केला आहे.

View this post on Instagram