जीम, वॉकसाठी वेळ नाही? मग घरातच चाला 10,000 पावले
Marathi June 03, 2026 07:25 PM

जर तुम्हाला रोजच्या बिझी लाईफस्टाईलमुळे फिटनेससाठी वॉकिंग करणे शक्य नाही. तर तुम्ही घरातच 65 मिनिटांत 10,000 पावले चालत पूर्ण करु शकता. यासाठी काय कराव लागेल ते बघूया.

1. जागेवर चालणे (15 मिनिटे)
टीव्ही पाहताना किंवा गाणी ऐकताना जागेवर चालत राहा.
हातांची हालचाल वाढवा.
अंदाजे 2,000 ते 2,500 पावले पूर्ण होऊ शकतात.

2. घरभर वेगाने चालणे (15 मिनिटे)
हॉल, गॅलरी किंवा घरातील मोकळ्या जागेत फेऱ्या मारा.
वेग मध्यम ते जलद ठेवा.
सुमारे 2,000 पावले होऊ शकतात.

3. जिने चढणे-उतरणे (10 मिनिटे)
घरात किंवा इमारतीत जिने असल्यास त्यांचा वापर करा.
यामुळे कॅलरी जास्त खर्च होतात.
सुमारे 1,000 ते 1,500 पावले पूर्ण होतात.

4. म्युझिकसोबत वॉक किंवा डान्स वॉक (15 मिनिटे)
आवडती गाणी लावा आणि तालावर चालत राहा.
यामुळे व्यायाम कंटाळवाणा वाटत नाही.
सुमारे 2,000 ते 2,500 पावले पूर्ण होतात.

5. घरकामासोबत चालणे (10 मिनिटे)
वस्तू आवरणे, साफसफाई किंवा इतर हलकी कामे करताना अधिक हालचाल करा.
सुमारे 1,000 ते 1,500 पावले मिळू शकतात.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

आरामदायी शूज वापरा.
पाणी प्या.
सुरुवातीला कमी वेळेपासून सुरुवात करून हळूहळू वेग वाढवा.
फिटनेस ट्रॅकर किंवा मोबाईल अॅपद्वारे पावलांची नोंद ठेवा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.