मुंबई : पुढील काही तासांतच मान्सून (monsoon) केरळमध्ये दाखल होत असून महाराष्ट्रातही पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे, गेल्या चार महिन्यांपासून कडक ऊन आणि उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यंदा अल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस काळ कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीदरम्यान मुंबईतील (Mumbai) अरबी समुद्रात (sea) तब्बल 24 वेळा मोठी भरती असणार आहे. मोठी भरती याचा अर्थ सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
हवामान विभागाकडून समुद्रातील भरतीची तारीख आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दिनांक 16 जुलै 2026 रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जाणे टाळावे, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.
१. रविवार, दि. १४.०६.२०२६ सकाळी – ११.२४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५
२. सोमवार, दि. १५.०६.२०२६ दुपारी – १२.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८०
३. मंगळवार, दि. १६.०६.२०२६ दुपारी – ०१.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८७
४. बुधवार, दि. १७.०६.२०२६ दुपारी – ०१.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८६
५. गुरुवार, दि. १८.०६.२०२६ दुपारी – ०२.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७९
६. शुक्रवार, दि. १९.०६.२०२६ दुपारी – ०३.३२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४
१. सोमवार, दि. १३.०७.२०२६ सकाळी – ११.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३
२. मंगळवार, दि. १४.०७.२०२६ दुपारी – १२.०४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३
३. बुधवार, दि. १५.०७.२०२६ दुपारी – १२.५१ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८५
४. गुरुवार, दि. १६.०७.२०२६ दुपारी – ०१.३६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८९
५. शुक्रवार, दि. १७.०७.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३
६. शनिवार, दि. १८.०७.२०२६ दुपारी – ०३.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६
१. बुधवार, दि. १२.०८.२०२६ सकाळी – ११.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६८
२. गुरुवार, दि. १३.०८.२०२६ दुपारी – १२.२८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८१
३. शुक्रवार, दि. १४.०८.२०२६ दुपारी – ०१.०७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.८३
४. शनिवार, दि. १५.०८.२०२६ दुपारी – ०१.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३
५. रविवार, दि. १६.०८.२०२६ दुपारी – ०२.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०
१. गुरुवार, दि. १०.०९.२०२६ सकाळी – ११.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. शुक्रवार, दि. ११.०९.२०२६ दुपारी – १२.०० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६५
३. शनिवार, दि. १२.०९.२०२६ दुपारी – १२.३४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६१
४. रविवार, दि. १३.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.०२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१
५. सोमवार, दि. २८.०९.२०२६ मध्यरात्री – ००.३८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५१
६. मंगळवार, दि. २९.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
७. बुधवार, दि. ३०.०९.२०२६ मध्यरात्री – ०१.५३ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५६