ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
जयदीप मेढे June 03, 2026 11:43 PM

हैदराबाद : देव तारी त्याला कोण मारी... असं म्हणतात, आंध्र प्रदेशमधील कुरनुलमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पाण्यात बुडणारी एक चिमुकली बचावली पण तिला वाचवण्यासाठी नदीत (River) उडी घेणारे तरुण मात्र बुडाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. पाण्यात बुडणाऱ्या मुलीला वाचविताना ती मुलगी (Girl) बचावली पण तिला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेले पाचही जण पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेशच्या (AP) कुरनूलमध्ये शनिवारी तुंगभद्रा नदीत पाय धुताना तोल गेल्याने नदीत घसरून एक मुलगी जोरदार प्रवाहात वाहू लागली, त्यानंतर मुलीच्या बचावासाठी आवाज देण्यात आला, तिला वाचवण्यासाठी धावा करण्यात आला. त्यामुळे, मुलीला वाचविण्यासाठी 4 ते 5 जणांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतलेले सर्वजण बुडाल्याची दु:खद घटना घडली. 

कुरनूल येथील तुंगभ्रदा नदीत 31 मे रोजी शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता अल्पवयीन मुलगी नदीत आपले हात-पाय धुण्यासाठी गेली होती. मात्र, पाय धुताना तिचा तोल गेल्याने ती नदीत पडली, त्यानंतर ती नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात बुडू लागली. त्यामुळे, स्थानिक आणि तिच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या बचावासाठी धावा करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथील 4 ते 5 जणांनी तात्काळ नदीत उड्या घेतल्या. मुलीला वाचविण्यासाठी सर्वांचीच धडपड दिसून आली. पाण्यात पडलेल्या मुलीला वाचविण्यासाठी 5 जणांनी नदीत उडी घेतली. या मुलांकडून मुलीला वाचवण्यात यश आलं, पण हे पाचही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पाण्यात बुडालेले सर्वचजण शेजारील गावातील रहिवाशी असल्याची माहिती आहे.  

राज्य आपत्ती व्यवस्थापन (एसडीआरएफ) च्या पथकाला माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नदीत उतरुन बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यात आला. मात्र, या दुर्दैवी घटनेत पाचही मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.