श्रीरामपूर : पाकिस्तानशी संबंधित सोशल मीडिया रिल्स पाहणे, तसेच त्यावर आक्षेपार्ह स्वरूपाच्या प्रतिक्रिया नोंदविण्याच्या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) श्रीरामपूर शहरात चौकशी मोहीम सुरू केली आहे. नगर, मुंबई, नाशिक आणि धुळे येथील एटीएसचे संयुक्त पथक शहरात दाखल झाले. पहाटेपासून विविध ठिकाणी पडताळणी आणि चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्तशहरातील चार तरुणांची एटीएसने सखोल चौकशी केली आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणांच्या सोशल मीडिया खात्यांची माहिती, त्यांनी पाहिलेला आणि शेअर केलेला मजकूर, तसेच ऑनलाइन हालचालींची तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या कारवाईमुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या चौकशीमागील नेमके कारण आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, एटीएसचे पथक केवळ शहरापुरते मर्यादित न राहता श्रीरामपूर तालुक्यातील काही ग्रामीण भागातही चौकशी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. काही व्यक्तींच्या सोशल मीडिया व्यवहारांबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे.
संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे व डिजिटल माहितीची पडताळणी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून सोशल मीडियावरील देशविरोधी, भडकावू किंवा संशयास्पद स्वरूपाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. तथापि, श्रीरामपुरातील या प्रकरणात चौकशीचा अंतिम निष्कर्ष काय आहे आणि संबंधितांवर पुढील कोणती कारवाई होणार आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Success Story: अंगणवाडी सेविकेच्या तिन्ही मुलांची सरकारी सेवेत भरारी; एक मंत्रालयात, दोघे मुंबई पोलिसांत, शेतकरी कुटुंबाची प्रेरणादायी यशोगाथा अधिकृत निवेदन नाहीदरम्यान, एटीएस किंवा स्थानिक पोलिस प्रशासनाकडून या कारवाईबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीचे स्वरूप, त्यातील निष्कर्ष आणि नोटिसा बजावण्यामागील कारणे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.