नागपूर : नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामात चोरी करून 11.39 लाख रुपयांचा माल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह तीन आरोपींना कलमना पोलिसांनी (Nagpur Crime News) अटक केली आहे. तपासादरम्यान अल्पवयीन आरोपींनी त्यांच्या गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी ही चोरी केल्याची (Nagpur Crime News) धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यशोधरानगर येथील इरफान अली उर्फ इम्मू रमजान अली आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी राहुल जयचंद ब्रह्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Nagpur Crime News)
राहुल हे कलमना परिसरात राहुल सिरॅमिक्स प्रा. लि. कंपनी चालवतात. त्यांच्या गोदामात टाइल्स, सॅनिटरी साहित्य आणि सीपी फिटिंगचा साठा आहे. 27 आणि 28 मेच्या मध्यरात्री चोरट्यांनी गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावरील टिनपत्रे फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कृषी वापरातील एमबी मॉडेलचे नळ, घरगुती वापरातील विविध प्रकारचे नळ तसेच इतर साहित्य चोरी करून नेले. कलमना पोलिसांनी तपासादरम्यान विविध भागांतील 25 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्याआधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी चोरीची कबुली दिली.(Nagpur Crime News) पोलिस तपासात असेही उघड झाले की, एका अल्पवयीन आरोपीच्या गर्लफ्रेंडने त्याच्याकडे आयफोनची मागणी केली होती. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मित्रांच्या मदतीने चोरीचा कट रचला आणि ही घटना घडवून आणली. या प्रकरणाचा पुढील तपास कलमना पोलीस करत आहेत.(Nagpur Crime News)
याप्रकरणी कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड, यांनी माहिती देताना सांगितलं की, "फिर्यादी जे आहेत, राहुल जयचंद बत्रा, यांचे एक गोडाऊन आहे. टाईल्सचे गोडाऊन, टाईल्स आणि त्याच्यामध्ये आपले जे बाथरूमचे नळ वगैरे आहेत, लक्झरियस नळ वगैरे, असे एक गोडाऊन आहे आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक ०१/०६/२०२६ रोजी काही अज्ञात आरोपींनी चोरी केल्याने, जवळपास ११,३९,७१० रुपये किमतीचे नळ, म्हणजे लक्झरी नळ चोरी करून गेले होते.
त्या अज्ञात आरोपींविरुद्ध आपण पोलीस ठाण्यामध्ये ५३५/२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) बीएनएस (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच तपास पथकातील सर्व स्टाफ आम्ही घटनास्थळी व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर माननीय झोन ५ मॅडम यांनी आम्हाला घटनास्थळी काही सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनेच्या अनुषंगाने परिसरातील घटनास्थळाच्या जवळपासचे कॅमेरे आम्ही पाहिले आणि आमचा जो सोर्स होता, इंटरनल सोर्स, तो ऍक्टिव्ह केला आणि आम्हाला माहिती मिळाली की, मिनीमाता नगर येथे राहणारे जे दोन विधिसंघर्ष बालक आहेत, त्यांनी ही चोरी केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं आणि दोन विधिसंघर्ष बालक यांना आम्ही ताब्यात घेतलं.
त्यांच्या पालकांसमक्ष आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर गुन्ह्यामध्ये जे नळ चोरी करण्यात आले होते, ते चोरलेले नळ त्यांनी यशोधरा नगर येथे राहणारा एक फेरीवाला आहे, त्याचे नाव आहे इरफान अली उर्फ इम्मु रमजान अली, राहणार फुटक नगर, यशोधरा. सदर इस्माकडे त्यांनी सदर सर्व मुद्देमाल २०,००० रुपये किमतीमध्ये विकलेला, असं आम्हाला तपासात निष्पन्न झालं.
तपासात निष्पन्न झाल्यावरून आम्ही लगेच टीम रवाना करून इरफान अली याला ताब्यात घेतलं आणि इरफानला ताब्यात घेऊन आम्ही त्याला अटक केली. अटकेदरम्यान त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानेही गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि सर्व मुद्देमाल त्याने जे खरेदी केलं होतं, ते मुद्देमाल त्याने परत केलेलं आहे. जवळपास ६,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि इरफान अटक आहे. त्याचा पीसीआर (PCR) आपल्याला ०४/०६/२०२६ रोजीपर्यंत मिळालेला आहे. इरफानकडे बाकी तपास सुरू आहे.
आणि सदरच्या कारवाईमध्ये आपण तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की, दोन विधिसंघर्ष बालकांनी जी चोरी केलेली आहे, त्यांच्याकडे कारण जाणून घेतलं असता आपण, त्यांचं असं म्हणणं आलं की, त्यांची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला महागडा आयफोन (iPhone) द्यायचा होता तिला गिफ्ट आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी चोरी केल्याची त्यांनी कबुली आपल्याकडे दिलेली आहे.