मोतीलाल ओसवालचा नवीन 'क्लीन एन्वायरमेंट' NFO लाँच; अवघ्या ५०० रुपयांमध्ये पर्यावरणपूरक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी
ET Marathi June 05, 2026 10:45 AM
भारतीय शेअर बाजारात शाश्वत विकास (Sustainable Development) आणि पर्यावरणपूरक उद्योगांच्या व्यवसायात वाढ होत आहे. हेच ओळखून मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड (MOMF) ने गुंतवणूकदारांसाठी एक अभिनव आणि पर्यावरण केंद्रित योजना आणली आहे. कंपनीने 'मोतीलाल ओसवाल बीएसई क्लीन एन्वायरमेंट इंडेक्स फंड' (Motilal Oswal BSE Clean Environment Index Fund) हा नवीन फंड ऑफर (NFO) बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक आणि भविष्यातील 'क्लीन इकॉनॉमी'चा भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना यात केवळ ५०० रुपयांच्या अगदी किरकोळ एकरकमी (Lumpsum) गुंतवणूक सुरू करता येणार आहे.

काय आहे या फंडाचे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य?हा एक ओपन-एंडेड (गुंतवणुकीसाठी कधीही उपलब्ध असलेला) आहे. हा फंड 'बीएसई क्लीन एन्वायरमेंट टोटल रिटर्न इंडेक्स'ला (BSE Clean Environment Total Return Index) ट्रॅक करेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, या इंडेक्समध्ये ज्या कंपन्यांचा समावेश आहे, त्याच कंपन्यांमध्ये हा फंड हुबेहूब गुंतवणूक करेल. खर्च वजा जाता, या इंडेक्सच्या कामगिरीइतकाच परतावा देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र, इंडेक्स फंडांमध्ये असणारा 'ट्रॅकिंग एरर'चा धोका यातही राहू शकतो.

गुंतवणुकीचा कालावधी आणि नियमहा NFO ५ जून २०२६ (शुक्रवार) पासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून, १९ जून २०२६ पर्यंत यात पैसे गुंतवता येतील. सुरुवातीला किमान ५०० रुपये आणि त्यानंतर १ रुपयांच्या पटीत कितीही रक्कम गुंतवता येईल. एनएफओचा कालावधी संपल्यानंतरही नियमित गुंतवणुकीसाठी किमान मर्यादा ५०० रुपयेच असेल.

गुंतवणूकदारांनी एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे 'एग्झिट लोड'. जर तुम्ही युनिट्स मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत पैसे काढून घेतले, तर १% एग्झिट लोड (शुल्क) द्यावा लागेल. १५ दिवसांनंतर पैसे काढल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

NFO विषयी थोडक्यात कररचना कशी असेल?या फंडातील नफ्यावर नवीन नियमांनुसार कर लागू होईल:

  • लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG): जर तुम्ही १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवली, तर वर्षाला १.२५ लाखांपेक्षा जास्त होणाऱ्या नफ्यावर १२.५% दराने कर आकारला जाईल.
  • शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG): १२ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूक काढून घेतल्यास होणाऱ्या नफ्यावर थेट २०% कर लागू होईल.
या ५ क्षेत्रांवर असणार विशेष भरहा फंड प्रामुख्याने भारताच्या वेगाने बदलणाऱ्या 'क्लीन इकॉनॉमी व्हॅल्यू चेन' मधील सुमारे २५ आघाडीच्या कंपन्यांमध्ये करणार आहे. यामध्ये खालील ५ प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे:
१. रिन्युएबल एनर्जी (सौर आणि पवन ऊर्जा):
या क्षेत्राचा वाटा या इंडेक्समध्ये सर्वाधिक म्हणजेच सुमारे ८६% आहे.
२. इलेक्ट्रिक व्हेईकल (EV):
भविष्यातील वाहतूक व्यवस्था.
३. वॉटर ट्रीटमेंट:
पाण्याचे पुनरुज्जीवन आणि व्यवस्थापन.
४. रिसायकलिंग (पुनर्वापर):
कचरा आणि प्लास्टिकचा पुनर्वापर करणाऱ्या कंपन्या.
५. वेस्ट मॅनेजमेंट:
कचरा व्यवस्थापन.

दीर्घकालीन भांडवल वाढवू इच्छिणाऱ्या आणि भारताच्या ऊर्जा संक्रमणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या पॅसिव्ह गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

फंडाचे व्यवस्थापन कोण करणार?या फंडाच्या इक्विटी (शेअर्स) भागाचे व्यवस्थापन स्वप्निल मयेकर आणि दिशांत मेहता (एसोसिएट फंड मॅनेजर) यांच्या अनुभवी जोडीकडे असेल. तर, फंडातील डेट (कर्जरोखे) आणि रोख भागाची जबाबदारी राकेश शेट्टी सांभाळतील.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.