Poha Idli Recipe: पोह्यांपासूनही इडली बनते हे माहिती आहे का? चव अशी की पुन्हा पुन्हा बनवाल
esakal June 05, 2026 10:45 AM

तुम्हालाही रोजच्या नाश्त्यात तेच ते पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आला आहे का? मग एकदा पोह्यांपासून बनणारी मऊ, स्पॉंजी आणि चविष्ट इडली नक्की ट्राय करा. तांदूळ भिजवण्याची किंवा रात्रभर तयारी करण्याची गरज नसल्यामुळे ही रेसिपी झटपट तयार होते. कमी साहित्य, कमी मेहनत आणि भरपूर चव यामुळे पोह्यांची इडली सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत खाल्ल्यास तिची चव आणखी खुलते. जाणून घेऊया पोह्यांची मऊसूत इडली बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य
  • एक वाटी पोहे

  • अर्धी वाटी रवा

  • दोन वाटी ताक

  • मीठ

  • पाव चमचा खायचा सोडा

Crispy Potato Chilla Recipe: पोहे, उपमा खाऊन कंटाळलात? मग नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा चिल्ला कृती

- पोहे मिक्सरच्या भांड्यामधून पावडर करून घ्या.

- तयार केलेल्या पोह्याच्या पावडरमध्ये बारीक रवा मिसळा.

- आता दळलेल्या पोह्यामध्ये आणि रव्यामध्ये ताक मिसळा. रवा आणि पोहे ताकामध्ये भिजले जातील याची काळजी घ्या.

- आता दहा मिनिटांसाठी ताकामध्ये पोहे आणि रवा भिजत ठेवा.

- दहा मिनिटांनंतर मिश्रणामध्ये पाणी मिसळून इडलीसाठी पीठ करून घ्या.

- पिठात चवीनुसार मीठ घाला आणि इडलीच्या साच्याला तेल लावून घ्या.

- इडलीपात्रामध्ये पाणी उकळून घ्या.

- आता पिठामध्ये पाव चमचा खायचा सोडा मिक्स करून घ्या आणि इडलीच्या साच्यामध्ये पीठ भरून घ्या.

- इडली दहा ते बारा मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्या.

- अशी गरमागरम पोह्याची इडली सांबारबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.