मुखेड (नांदेड) : येथील हुतात्मा माधव विद्यालयाच्या मुख्याध्यापकने शालेय खर्चाची रक्कम अॅडजस्ट करणे आणि बदली करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याची तक्रार विद्यालयातील लिपिकाने (Nanded headmaster bribery case 2026) केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शहानिशा करून राजेश गोविंदराव पडलवार या मुख्याध्यापकावर बुधवारी (ता. ३) कारवाई केली आहे.
विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाखाली प्रतिमहिना १२ हजार रुपयांप्रमाणे जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांचे हप्ते, तसेच तक्रारदाराची बदली करून देणे आणि त्यांना नोटीस न देण्यासाठी मुख्याध्यापकाने तब्बल ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. या जाचाला कंटाळून लिपिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
बुधवारी (ता. ३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शासकीय पंचांसमक्ष पडताळणी केली. तक्रारदाराने मुख्याध्यापकाला कॉल केला असता, त्याने त्यांना शारदानगर, नांदेड येथील आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. तिथे शासकीय पंचांसमक्ष मुख्याध्यापक पडलवार याने ६० हजारांच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच 'आता यापुढे तुला हप्ता देण्याची गरज नाही, यातच तुझी बदली करून घेतो', असे आश्वासनही दिले.
Wardha ACB Trap : 9 लाखांच्या बिलासाठी अडीच लाखांची लाच! वर्धा पालिकेचा नगर अभियंता एसीबीच्या जाळ्यात, लाचेची 2 लाख रुपये रक्कम ठेवायला सांगितली शौचालयातलाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर, एसीबीच्या पथकाने शारदानगर येथील मुख्याध्यापकाच्या घरी सापळा रचला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक राजेश पडलवार याला पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक मोबाइल, पिवळ्या धातूची अंगठी, ओळखपत्रे आणि ५,५०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली आहे. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
Ratnagiri ACB Trap : चिपळूण हादरलं! गर्भनिरोधक गोळ्यांसाठी मागितली 4,400 रुपयांची लाच; कामथे रुग्णालयातील महिला डॉक्टर 'एसीबी'च्या जाळ्यातमुख्याध्यापक माझ्या साडूचा मुलगा आहे, तर लिपिक हा पुतण्या असून सदरील घटना परस्परांच्या हातउसण्या रकमेवरून घडली आहे. यामध्ये हुतात्मा माधव विद्यालयाचा कसलाही संबंध नाही. याबाबत माहिती घेऊन लवकरच निर्णय घेणार आहे.
-अनिल कोल्हे, सचिव, नीतिनिकेतन संस्था