अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून इराणविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले. इस्त्रायल आणि अमेरिका यांनी मिळून संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. अमेरिकेच्या पहिल्याच हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. या यशाला पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, इराणसोबत जास्तीत जास्त 4 आठवडे युद्ध सुरू राहिल. त्यानंतर इराण हार मानेल. मात्र, इथेच खरी मोठी चूक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला फार जास्त हलक्यात घेतले. इराणला कोणतीही कल्पना नसताना अमेरिकेने हल्ला केल्याने सुरूवातीला त्यांचे नुकसान झाले. त्यानंतर इराण ज्या पद्धतीने पेटून उठला, ज्याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. इराण प्रचंड आक्रमकतेने युद्ध लढत आहे. या युद्धाला आता जवळपास 3 महिने होऊन गेली, जगाची वाट या युद्धात लागली. मात्र, अमेरिकेच्या इतक्या मोठ्या लष्करी कारवाईनंतरही इराणने हार मानली नाही.
होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग वैतागले आहे. यादरम्यानच अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणची ताकद मान्य केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट इराणचे काैतुक करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ते (म्हणजे इराणी लोक) सामर्थ्यवान आहेत. नक्कीच त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान आहे. मुळात म्हणजे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागत आहेत, ज्याची त्यांना कल्पना नव्हती.
सध्या तरी ते कोणत्या कराराला तयार नाहीत. पण त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी पुढे म्हटले की, होय कराराला थोडा वेळ लागू शकतो. पण यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर हार मानत इराणी लोक ताकदवान असल्याचे मान्य केले. थेट इराणी लोकांचे काैतुक करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. त्यांनी इराणी संस्कृतीचा अभिमान असल्याचेही म्हटले.
इराणसोबतचे युद्ध संपवण्याकरिता मोठा दबाव अमेरिकेवर आहे. इराणने स्पष्ट म्हटले आहे की, युद्ध आम्ही सुरू केले नाही तर अमेरिकेने केले आहे. त्यांनी आमच्यावर पहिला हल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेला अजिबातच वाटले नव्हते की, इराण इतका खतरनाक होऊन या युद्धाला उत्तर देईल. इराण आणि अमेरिक युद्धाच्या झळा जगाला बसत आहेत.