अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरुच, पाच दिवसात 2 कोटींचा माल जप्त, 192 आरोपींना अटक 
अजय माने June 06, 2026 10:13 PM

मुंबई :  प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची राज्यव्यापी धडक कारवाई (Action by the Food and Drug Administration Department) सुरुच आहे. 1 जून ते 5 जून 2026 या पाच दिवसांत राज्यभर 195 धाडी टाकल्या आहेत. या कारवाईदरम्यान 192 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत 123 FIR दाखल झाले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर विशेष धाडसत्र सुरु आहे.  

अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा

धाराशिव जिल्ह्यातील परंडा इथं 1 कोटी 2 लाख 67 हजार 263 किंमतीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. तर समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर 60 लाख 50 हजार किमतीचा माल आणि वाहन जप्त केली आहेत. धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे 23 लाक 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. नांदेडच्या महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागात 17 लाख 52 हजार किंमतीचा माल व वाहन जप्त करण्यात आले आहे. पुण्यातील मोशी येथे 6.19 लाखांचा माल जप्त केला आहे. तर 6 जणांविरोधात FIR दाखल केले आहे. राज्यातील अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

बृहन्मुंबई विभागात 30 धाडी टाकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी 30 जणांना अटक करण्यात आली आहे. कोकण विभागात सर्वाधिक 79 धाडी टाकल्या आहेत. तर 78 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे विभागात 52 धाडी तर 52 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्ती मोहीम
(1 जून 2026 ते 5 जून 2026)

बृहन्मुंबई

धाडी - 30
जप्त साठा - 3,42,055
FIR - 15
अटक - 30

कोकण

धाडी - 79
 जप्त साठा - 8,19,618
FIR - 34
अटक - 78

पुणे

धाडी - 52
जप्त साठा - ₹15,10,455
FIR - 41
अटक - 52

नाशिक

धाडी - 8
 जप्त साठा - ₹35,56,830
FIR - 8
अटक - 8

छत्रपती संभाजीनगर

धाडी - 9
जप्त साठा - ₹1,15,64,533
FIR - 8
अटक - 8

नागपूर

धाडी - 15
जप्त साठा - 12,29,728
FIR - 15
अटक - 15

अमरावती

धाडी - 2
जप्त साठा - ₹8,95,256
FIR - 2
अटक - 1

एकूण

धाडी - 195
जप्त साठा - 1,99,18,475
FIR - 123
अटक - 192

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. ही तपासणी सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे. नागरिक तसेच ग्राहकांची काही तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सह आयुक्त दि. ज्ञा. तांबोळी यांनी केले आहे. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.