Nursery Education: नर्सरीपासूनच इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय; पण तज्ज्ञांची वेगळीच भूमिका
esakal June 06, 2026 10:45 PM

मुंबई : नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने नर्सरीच्या वर्गापासून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याविरोधात मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

भाषा मराठी शाळा आणि मराठी वाचविण्यासाठी सरकार एकीकडे घोषणा करीत असताना नवी मुंबई महापालिकेत मराठी भाषा धोरणाविरोधात निर्णय घेण्यात आला असून तो तत्काळ रोखला जावा, अशी मागणी डॉ. जोशी यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. मराठी माध्यमांच्या नर्सरीपासूनच शाळांचे इंग्रजीमाध्यमाच्या शाळांत रूपांतर करणे, पर्यायाने मराठी माध्यमाच्या शाळा नर्सरी म्हणजे मुळापासूनच इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याचे घोरण आहे, असा होतो.

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

हा मराठी माध्यमाच्या शाळांवरच घाव घालणारा आहे. यामुळे इंग्रजीकरणाचे हे लोण राज्यभर पसरणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात इंग्रजी हा विषय पहिल्या वर्गापासून, नोव्हेंबर, १९९९ पासून सक्तीचा करण्यात आला, तेव्हापासूनच मराठीची जी अवहेलना सुरू झाली ती एवढी कळसाला पोहोचली आहे, की ९४ हजार विद्यार्थी या मराठी भाषिक राज्यात, मराठी या

भाषा मातृभाषेतच नापास होण्याची वेळ आली आहे. तेव्हापासूनच बालशिक्षण तज्ज्ञ, बालमानसतज्ज्ञ, वैज्ञानिक, प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषा माध्यमातूनच दिले जाणे कसे आवश्यक आहे, हे शासनाला सतत सांगत आले आहेत, असेही डॉ. जोशी यांनी म्हटले आहे.

Transgenders Scheme: तृतीयपंथीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यवसायासाठी २ लाख मिळणार; कसा लाभ घेता येणार?

नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत ११४ नर्सरी (अंगणवाड्या) कार्यरत असून यात शिक्षण रूपांतर धोरणाअंतर्गत नर्सरीपासूनच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र यातून मराठीला डावलल्याचा कोणताही प्रयत्न नाही. मराठीचाही विकल्प पालकांना देण्यात आला आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांच्या मागणीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. जागतिकस्तरावरील एकूण गरजा, पालकांच्या मागण्या लक्षात घेऊन इंग्रजीचा पर्याय देण्यात आला आहे.

- संघरत्ना खिल्लारे, शिक्षण उपायुक्त, नवी मुंबई महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.