टीएमसीच्या राज्य अल्पसंख्याक कक्षाचे सचिव अजमल सिद्दीकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भद्रा मारुती दर्शन रांगेत पाण्याच्या फवार्यांचा गारवाछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाच्या तीव्र झळांपासून संरक्षण मिळावे यासाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पाऊसजळगाव जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाने रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.
कल्याण-कसारा दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतकल्याण-कसारा दरम्यान वायर हेड तुटल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Dhule Live: धुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहितधुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामांसाठी तब्बल 48 खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. साक्री शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे. साखरी तालुक्यातील 25 गावांसाठी 25 विहिरी तर शिंदखेडा तालुक्यातील 23 गावांसाठी 21 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. धुळे तालुक्यातील जुन्नर आणि शिंदखेडा तालुक्यातील धांगरणे गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
Pune Live: पुणेकरांवार पाणी कपातीचे संकट?पुणेकरांवार पाणी कपातीचे संकट.. एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयावर विचार सुरू.. मान्सूनला झालेला विलंब आणि धरण क्षेत्रातील घटलेला पाणीसाठा यामुळे निर्णय होण्याची शक्यता.. धरणांमध्ये २० टक्के पाणीसाठा शिल्लक..
Gondia LIve: गोंदिया जिल्ह्याचे तापमान पुन्हा 41 पार…गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे… गोंदिया जिल्ह्याचे तापमान गेल्या दोन दिवसापासून 41 पार झाल्याचे दिसून आलाय त्यामुळे उकाडापासून नागरिक हैराण झाले आहेत…. दुपारच्या वेळी नागरिकांच्या रस्त्यावर सुखसुकाट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने सुद्धा आव्हान केला की आवश्यक काम असल्याचे घराच्या बाहेर पडावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे….
PM Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पीएम-आर्थिक सल्लागार परिषदेची महत्त्वाची बैठकजागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यावर विचारमंथन करण्यात आले. ‘ईज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ सुधारण्यासाठी विविध सुधारणा उपक्रमांचे परीक्षण करण्यात आले. तसेच, पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जागतिक पातळीवरील परिणामांचा आढावा सदस्यांनी मांडला.
CM Fadnavis Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. साखळी आंदोलन पुढील शनिवारीही सुरू राहणार असून, आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत राजीनामा न दिल्यास पुढील शनिवारी पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली आहे.
Malangaon Live : मालनगाव धरणात काँग्रेसचे जलसमाधी आंदोलन; 17 गावांसाठी पाणी सोडण्याची मागणीमालनगाव धरणातून कान नदीकाठावरील 17 गावांना सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मालनगाव धरण परिसरात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शेतकरी आणि नागरिकांच्या पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Nashik Live कांदा खरेदीतील तक्रारींची केंद्रस्तरीय चौकशी; गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशाराकांदा खरेदी प्रक्रियेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची केंद्र स्तरावर सखोल चौकशी केली जाणार असून आवश्यक असल्यास स्वतंत्र तपासही करण्यात येणार आहे. आतापर्यंत संबंधित संस्थांकडून सुमारे दोन हजार क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली असून दोन लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी येत्या काळात यापेक्षाही अधिक प्रमाणात कांदा खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
Nashik News: भाजपची सत्ता मिळवण्यासाठी कुठलाही गैरप्रकारचा वापर करायचा त्यांची नीती - बाळासाहेब थोरातविजय वेड्डेटीवार यांचा विधानाबाबत मला माहित नाही मात्र विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने दहशतीचा वापर केलेला आहे. भाजपची कोणत्याही प्रकारे सत्ता मिळवण्याची नीती असून त्यासाठी कुठलाही गैरप्रकारचा वापर करायचा त्यांची नीती आहे. जे बंगालमध्ये चालू होतं ते आता महाराष्ट्रात सुरू झाल आहे, दहशत सुरू आहे. गैर मार्गाचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे
पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाचे नेतृत्व करत राहावे - उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यप्रयागराज उत्तर प्रदेश, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विक्रमी टप्प्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या प्रशासकीय कामगिरीची प्रशंसा केली. ते म्हणाले, "जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि लोकशाही निवडणुका सुरू झाल्यापासून देशाचे नेतृत्व अनेक पंतप्रधानांनी केले आहे. मात्र, १० जून रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचा सर्वाधिक कालावधी पूर्ण करण्याचा विक्रम प्रस्थापित करतील. आम्हाला याचा अभिमान वाटतो; आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि प्रार्थना करतो की, २०४७ पर्यंत 'विकसित भारत'चे स्वप्न साकार होईपर्यंत ते देशाचे नेतृत्व करत राहावेत... जर तुम्ही सामान्य जनतेला विचारले, तर त्यांना आज सुरक्षित वाटते आणि ते अभिमानाने सांगतात की भाजप सरकारच्या काळात त्यांना सर्वच बाबतीत सुरक्षितता जाणवते. शिवाय, मोठे गुन्हेगार, माफिया, भ्रष्ट लोक आणि दंगलखोर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे आणि ती यापुढेही केली जाईल."
Delhi Fire: दिल्लीतील प्लास्टिक कारखान्यात भीषण आगनरेला औद्योगिक क्षेत्रातील एका प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
टी-२० संघाचं श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद
तिलक वर्मा उपकर्णधार
वैभव सूर्यवंशीचा टी-२० संघात समावेश
Nashik News: मालेगावातील न्यायालयासमोरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातमालेगावातील न्यायालयासमोरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात
Nashik Live बाजारसमितीतून थेट कांदा खरेदीचा मार्ग मोकळा; सोमवारपासून खरेदीला सुरुवातकेंद्र सरकारच्या कांदा खरेदी मोहिमेला गती देण्यासाठी अखेर बाजारसमितीतून थेट खरेदीसंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे आता सरकारी खरेदी यंत्रणा थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी करू शकणार असून यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहकारी संस्थांना व्यापारी परवाने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी अधिक सुलभ व्यवस्था उपलब्ध होणार असून येत्या सोमवारपासून थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Nashik Live कांद्याच्या खरेदीसाठी प्रशासनाची पुढाकार बैठक, शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्यानाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि विविध बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा होत असून कांदा खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाला थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला असून या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nashik Live गोकुळ गीते ठाम; महाजन-सामंतांचे प्रयत्न निष्फळ, तोडग्याच्या हालचाली वेगातनाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे समोर आले आहे. दिवसभर त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांनी दोन्ही वरिष्ठ नेत्यांची भेट टाळल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याचे चित्र दिसत असले तरी लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास संबंधित नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुढील चर्चा आणि समन्वयासाठी एक वरिष्ठ नेता आज रात्री नाशिकमध्ये पुन्हा मुक्कामी येणार असून दुसरे नेतेही उद्या रात्री शहरात दाखल होण्याची शक्यता आहे.
जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरूजंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू
जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू, अभिजीत दिपकेही उपस्थित, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
एआयने प्रचंड मोठं काम शेतात केलं : शरद पवारएआयने प्रचंड मोठं काम शेतात केलं : शरद पवार
शेती, आरोग्य आणि सगळ्या क्षेत्रात आज ए आय चे महत्त्व आहे
एआयने प्रचंड मोठं काम शेतात केलं आहे
प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे
Latest Marathi News Update: Nagpur : डीआरआयची नागपुरात मोठी कारवाई, ५२२ किलोहून अधिक गांजा जप्तडीआरआयची नागपुरात मोठी कारवाई, ५२२ किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. २ कोटी ६१ लाख रुपये किमतीच्या गांज्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डीआरआयच्या कारवाईत दोन तस्कर अटकेत आहेत. ओडिशा-महाराष्ट्र ड्रग्ज तस्करी नेटवर्कवर डीआरआयचा प्रहार. मौदा जवळील मथनी टोल प्लाझावर ट्रक पकडण्यात आला. ट्रकमधील गुप्त कप्प्यात लपवून गांज्याची वाहतूक करण्यात येत होती. ओडिशा-आंध्र सीमेकडून महाराष्ट्रात गांजा आणला जात होता. ही अमली पदार्थांविरोधातील वर्षातील मोठ्या कारवायांपैकी एक.
Nagpur Live: नागपूरमध्ये ३५३ व्या शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त साहसी खेळांचं सादरीकरणछत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३५३ वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा आहे. या निमित्ताने नागपूरमधील महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमिंकडून साहसी खेळांचं सादरीकरण आयोजन करण्यात आले.
IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्याला मुल्लनपूरमध्ये सुरुवातभारताच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याला मुल्लनपूरमध्ये सुरुवात झाली आहे. हा सामना रिषभ पंतसाठी कारकिर्दीतील ५० वा सामना आहे. तसेच भारताकडून मानव सुतारचे पदार्पण झाले आहे.
CJP Delhi Protest: कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलनकॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर-मंतरवर मैदानावर आंदोलन सुरू केल असून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Solapur Live: छत्तीसगडमधून आणलेला तब्बल ३६ किलो २७० ग्रॅम गांजा सोलापुरात जप्तस्थानिक गुन्हे शाखेची बोरामणी परिसरात मोठी कारवाई
७ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गांजासह दोन मोबाईल फोन पोलिसांच्या ताब्यात
हैदराबाद–सोलापूर महामार्गावरील हॉटेल वैष्णवी परिसरात सापळा
गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाची धडक कारवाई
CJP Delhi Protest कॉकरोच जनता पार्टीला आंदोलन करण्यास परवानगीकॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर इथं होणाऱ्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलीय. पार्लमेंट स्ट्रिट पोलीस ठाण्याबाहेर कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांनी गर्दी केली होती. समर्थकांना पोलिसांनी जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास सांगत पोलीस ठाण्याबाहेरची गर्दी कमी करण्याचं आवाहन केलं.
Nagpur News महिला पोलिसाशी हुज्जत प्रकरणी वाहन मालकावर गुन्हा- नागपुरात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत एका महिलेने घातला वाद, वाहनमालकावर गुन्हा दाखल..
- २ मे रोजी सकाळी सुमारे ९ वाजता सावरकर नगर चौकातील घटना.
- दुचाकी चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याचा संशय आल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याने लायसन्स दाखवण्याची मागणी केली..
ShivrajyaBhishek : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, महादरवाजाला सुवर्ण अलंकारिक तोरणछत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी शिवप्रेमींची लगबग सुरू झाली असून प्लॅस्टिकमुक्त रायगड व महादरवाजावर बसवले जाणारे सुवर्ण अलंकारिक तोरण यावर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहणार आहे.
Nashik News : टीसीएस प्रकरणातील ९ खटल्यांची मंगळवारपासून सुनावणीTCS प्रकरणातील ९ खटल्यांची सुनावणी येत्या मंगळवारपासून सुरू होणार
धर्मांतर, बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांवर सुरू होणार सुनावणी
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यांचे कामकाज सुरू होणार
मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश
CJP Andolan : अभिजीत दीपके भारतात दाखल, दिल्ली विमानतळावर पोहोचलेकॉकरोच जनता पार्टीकडून आज नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आलीय. दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन होणार असून सीजेपीचे अभिजीत दीपके हे भारतात दाखल झाले आहेत. दिल्ली विमानतळावरून जंतरमंतरकडे ते रवाना झाले आहेत.