Shubman Gill Scores Magnificent Century: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात (IND vs AFG) मुल्लनपूर येथे पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताचा डाव ३ बाद ३६८ धावांवर पोहोचला आहे. या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांचे वर्चस्व राहिले. याच सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल(Shubman Gill) याने आपल्या डावाची शानदार सुरुवात करत आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा.... गिलने गाठला मोठा टप्पाभारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिल याने भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीतील ११ वे कसोटी शतक झळकावले आहे. हे शतक पूर्ण करण्यासाठी त्याने १४३ चेंडूंची मदत घेतली. हे शतक झळकावल्यानंतर गिलने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
या विक्रमासह भारतीय कर्णधारांच्या यादीत त्याने आपले नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे, १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याने केवळ १५ डाव घेतले आहेत. भारतीय कर्णधारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान विक्रम आहे.
याशिवाय शुभमन गिलने हा टप्पा अवघ्या ३५१ दिवसांत पूर्ण केला आहे. भारतीय कसोटी कर्णधारांमध्ये १००० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेल्या कालावधीच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विक्रम ठरला आहे. शुभमन गिल हा कसोटी कर्णधार म्हणून १००० धावा पूर्ण करणारा ११वा भारतीय कर्णधार ठरला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद शतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले आणि त्याचबरोबर आपल्या नावावर हा खास विक्रमही नोंदवला. अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गिलने कर्णधार म्हणूनही आपली छाप सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्याकडून आणखी मोठ्या विक्रमांची अपेक्षा भारतीय चाहत्यांना असेल.
IND vs AFG,Test: केएल राहुल, शुभमन गिलचं खणखणीत शतक, सुदर्शन-पंतचीही दमदार फिफ्टी; पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्वपहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताचा डाव ३ बाद ३६८ धावांवर पोहोचला आहे. ज्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल १०३ धावांवर नाबाद आहे, तर दुसरीकडे केएल राहुलने शानदार शतक झळकावले. त्याने १६५ चेंडूंच्या मदतीने ११ चौकार आणि १ षटकारासह १२८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.