कुवैतमधील अफगाण दूतावासाचा ताबा तालिबानकडे
Marathi June 08, 2026 03:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुवैतमधील अफगाणिस्तानच्या दूतावासाचा ताबा तालिबान सरकारकडे सोपविण्यात आला आहे. या घडामोडीनंतर आखाती देशात तालिबान सरकारचे आणखी एक प्रतिनिधी कार्यालय जोडले गेले असून शफीक खतीब यांची या दूतावासाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खतीब हे यापूर्वी काबुलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या वाणिज्य दूतावास सेवा आणि सीमा व्यवहार विभागाचे प्रमुख होते.

गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही सरकारमध्ये चर्चा होती. कुवैतसोबतच आता रशिया, चीन, इराण, सौदी अरब, यूएई, ओमान, कतर आदी देशांनी अफगाण दूतावासाची जबाबदारी तालिबान सरकारकडे सोपविली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.