माधुरी दीक्षित बारीक असल्यानं सुरेश वाडकरांनी लग्नासाठी दिलेला नकार? उत्तर ऐकून पत्नी अन् मुलगीही हैराण
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 09, 2026 12:13 PM

Suresh Wadkar On Marriage Rumors With Madhuri Dixit: एकेकाळी बॉलिवूडची (Bollywood News) 'धक धक गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. अभिनेत्रीनं नंतर डॉ. श्रीराम नेने (Shriram Nene) यांच्याशी विवाह केला, मात्र त्याआधी त्यांचं नाव गायक सुरेश वाडकर (Singer Suresh Wadkar) यांच्याशी जोडलं जात होतं. त्या काळात माधुरींकडून सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, या नात्याला सुरेश वाडकर यांनी नकार दिला, अशी अफवाही मोठ्या प्रमाणावर पसरली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे, या चर्चेत माधुरी दीक्षित खूप बारीक असल्यामुळे हा प्रस्ताव नाकारण्यात आला, असा दावा केला जातोय. मात्र सुरेश वाडकर यांनी नेहमीच या अफवांचं खंडन केलं आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी पुन्हा या विषयावर प्रतिक्रिया देताना, ही अफवा नेमकी कशी पसरली आणि तिच्यामागचं सत्य काय आहे, याबाबत स्पष्टीकरण दिलंय. पत्नी पद्मा वाडकर आणि मुलीसमोरच त्यांनी या चर्चेचा उल्लेख करत, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गैरसमजांवर भाष्य केलंय.

सुरेश वाडकर यांनी नुकतीच 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितसोबतच्या लग्नाच्या अफवांवर भाष्य केलं. त्यावेळी ते म्हणाले की, माधुरी एखाद्या दिवशी माझे उरलेले केसही उपटून काढेल... तसेच, पुढे बोलताना माधुरीचं लग्नासाठी स्थळ आलेलं, या अफेववर भाष्य केलंय. ते म्हणाले की, "मूळात लग्नाच्या स्थळाची गोष्ट माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही, तर मी नकार कसा देऊ?"

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर नेमकं काय म्हणाले? (Suresh Wadkar On Madhuri Dixit)

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर बोलताना म्हणाले की, "माधुरी एखाद्या दिवशी माझे उरलेले केसही उपटून काढेल. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, इंडस्ट्रीतील माझी सहकारी आहे आणि मला ती खूप आवडते. हे सगळं अर्चना पूरण सिंगमुळे झालं. ती माझ्या बहिणीसारखी आहे, माझ्यावर खूप प्रेम करते. माहित नाही पण तिनं कुठून तरी हे ऐकलं आणि ती टीव्हीवर याबद्दल बोलली. तेव्हापासून मी कुठेही गेलो तरी तिथे मला प्रत्येक वेळी माधुरीबद्दल विचारलं जातं..."

"कदाचित त्यावेळी काहीतरी घडलं असेल आणि तिच्या वडिलांच्या बाजूनं काहीतरी चौकशी करण्यात आली असेल, पण लोकांनी लिहिलंय की, सुरेश वाडकर यांनी माधुरी खूप बारीक असल्यामुळे तिला नकार दिला. बारीक तर ती होतीच. तुम्ही माधुरीचा 'अबोध' चित्रपट पाहिला, तर त्यात ती तशीच बारीक दिसली आहे. पण मूळात लग्नाच्या स्थळाची गोष्ट माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही, तर मी नकार कसा देऊ? आणि तोपर्यंत पद्मा माझ्या आयुष्यात आली होती. पद्मा माझी विद्यार्थिनी होती आणि नंतर ती माझी पत्नी झाली...", असं सुरेश वाडकर यांनी पुढे बोलताना सांगितलं. 

Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण

ABP Majha च्या बातम्या LIVE: 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.