ट्राय नॅशन ए सीरिज 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान (India A vs Afghanistan A) आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाचा हा स्पर्धेतील दुसरा तर अफगाणिस्तानचा पहिला सामना असणार आहे. तिलक वर्मा याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे. तर इम्रान मीर अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या निमित्ताने इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए यांच्यातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कधी?इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना गुरुवारी 11 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कुठे?इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना दांबुल्यातील रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
टीम इंडियाने पहिल्या सामन्यात काय केलं?इंडिया ए टीमने या सीरिजमधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मात केली होती. भारताने 9 जून रोजी श्रीलंकेवर अवघ्या 8 धावांनी विजय मिळवला होता. भारताने ऋतुराज गायकवाड याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 277 धावा केल्या होत्या. श्रीलंकेने 278 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त अशी झुंज दिली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला. भारताने श्रीलंकेला 48.5 ओव्हरमध्ये 269 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे 8 धावांनी हा सामना जिंकत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आता भारतीय संघ तिलक वर्मा याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.