पिंपरी : हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे सर्वच मुहूर्त हुकले आहेत. आता पूर्ण मार्ग सुरू करण्यासाठी जुलै २०२७ पर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात डिसेंबर २०२६ पर्यंतचे उद्दिष्ट ‘पीएमआरडीए’ने ठरविले आहे. यातील पहिल्या १२ स्थानकांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण करून प्रवासी वाहतूक सुरू करणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी सांगितले. मात्र, डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..‘‘या मार्गावरील मेट्रो सुरू होण्याची प्रत्यक्षात मुदत संपली आहे. सध्याच्या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, माण डेपोपासून १२ स्थानके सुरू करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता. आगामी पावसाळा व इतर काही प्रलंबित कामांमुळे जून अखेरपर्यंत व तोपर्यंत शक्य न झाल्यास १५ जुलैपर्यंत कामे पूर्ण होऊ शकतील,’’ असे चौधरी यांनी सांगितले.
ठेकेदारावर कारवाई नाही‘मेट्रोेचे काम ‘पीपीपी’ तत्त्वावर सुरू आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरता येणार नाही. कोणताही दंड अथवा कारवाई करता येत नाही. विविध कारणांनी विलंब झाल्याचे ते सांगतात. आम्ही ते ग्राह्य धरत नाही. तूर्तास त्यांच्याकडून नव्याने मुदतवाढ मिळण्यासाठी प्रस्ताव आला आहे. सद्यस्थितीत मुतदवाढीमध्ये कामे सुरू असल्याने कारवाई करता येत नाही,’’ असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त स्थानकांच्या कामांचे उद्दिष्टपहिल्या टप्प्यात १२ स्थानकांची कामे पूर्ण करून १५ जुलैपर्यंत प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन
२ उर्वरित ११ पैकी शिवाजीनगरसह पाच स्थानकांची कामे ऑगस्टपर्यंत पूर्ण होतील
३ उर्वरित सहा स्थानकांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार. पण, जुलै-२०२७ पर्यंत मुदतवाढीची मागणी