Mamata Banerjee : रोजची कटिंग, आज अजून एक राजीनामा, आता उरले फक्त 10, ममता बॅनर्जींसोबत खेला होबे
Tv9 Marathi June 11, 2026 04:45 PM

काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांना अजून एक झटका बसला आहे. गुरुवारी पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बरेक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. एका आठवड्यात राज्यसभेतील तिसऱ्या खासदाराने राजीनामा दिला आहे. कालच 10 जून रोजी बुधवारी सुष्मिता देव यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेत तृणमुल काँग्रेसचे 13 खासदार होते. बरेक यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत आता TMC कडे फक्त 10 खासदार उरले आहेत. याआधी पक्षाचे वरिष्ठ नेते सुखेंदु शेखर आणि देव यांनी पद सोडलं आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.

पुढच्या काही दिवसात आणखी तीन खासदार राजीनामा देतील असं बोललं जातय. यात कोण आहे? ते अजून स्पष्ट नाहीय. रे यांनी पूर्वटीएमसीसरकारवर भ्रष्टाचार, कमजोर आरोग्य सेवा आणि शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. सुष्मिता देव यांनी राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलेलं नाही. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आसाचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा यांची भेट घेतली होती. लोकसभेत तृणमुल काँग्रेसच्या अनेक खासदरांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरांच्या या गटात 20 खासदार आहेत. यात युसूफ पठाण, सायोनी घोष, शताब्दी रॉय, काकोली घोष, शत्रुघ्न सिन्हा या खासदारांची नावं आहेत, असं बोललं जातय. काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली हे खासदार एनडीएचं समर्थन करण्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सोपवू शकतात.

रोज एक झटका

4 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तृणमुल काँग्रेसला 80 जागांवर विजय मिळाला. स्वत: ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. TMC ने पक्ष विरोधी कारवायांचा ठपका ठेऊन रिताब्रता बॅनर्जी आणि संदीपन साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली 60 आमदार एकत्रित झाले. आता यांची संख्या 64 असल्याचं बोललं जातं. लोकसभेत 28 पैकी 20 खासदारांनी बंडखोरी केली आहे. राज्यसभेत तीन खासदारांनी राजीनामा दिलाय. रोज एक-एक करुन बडे नेते पक्षातून बाहेर पडत असल्याने ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अडचणी वाढत चालल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.