फिफा वर्ल्ड कप 2026 ची बक्षीस रक्कम पाहून बसेल धक्का! IPL आणि क्रिकेट वर्ल्ड कपच्या तुलनेत रक्कम कित्येक पटींनी जास्त
Marathi June 12, 2026 12:25 AM

फिफा वर्ल्ड कप 2026 (Fifa world Cup 2026) च्या बक्षीस रकमेचा (Prize Money) आकडा पाहिला तर कोणाचेही डोळे विस्फारले जातील. फिफा (FIFA) या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेत तब्बल 50 टक्क्यांनी वाढ केली आहे. फिफाच्या या बक्षीस रकमेची तुलना जेव्हा आपण आयपीएल (IPL) 2026 किंवा क्रिकेट वर्ल्ड कपशी करतो, तेव्हा दोन्हीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो.

आयपीएल 2426 च्या विजेत्या संघाला जेवढी बक्षीस रक्कम मिळाली, त्याच्या 4 पटीने जास्त रक्कम तर फिफा वर्ल्ड कपमध्ये शेवटच्या क्रमांकावर (48 व्या) राहणाऱ्या टीमला मिळणार आहे. तर, 2026 मध्ये विजेता ठरलेल्या टीम इंडियाला सुमारे 21.9 कोटी रुपये मिळाले होते. 2023 मध्ये विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला 33 कोटी रुपये मिळाले होते आणि आता फिफा वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला तब्बल 476 कोटी रुपये मिळणार आहेत.

फिफा केवळ विजेत्या संघावरच नव्हे, तर सहभागी संघांवरही मोठी उधळण करत आहे. स्पर्धेत 33 व्या ते 48 व्या क्रमांकावर राहणाऱ्या टीमला केवळ सहभागी झाल्याबद्दल 86 कोटी रुपये दिले जाणार आहेत. अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या (उपविजेत्या) टीमलाही 314 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळणार आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 कडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असेल, त्यामुळे या स्पर्धेबाबतच्या प्रत्येक अपडेटबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.