दिवसभर शेतीचं काम अन् रात्री गावातल्या 40 महिला कमांडोची दररोज गस्त; कारण ऐकून थक्क व्हाल
तुषार कोहळे June 12, 2026 12:43 PM

Nagpur Women Commandos : महिलांनी मनावर घेतलं तर त्या काय करून शकतात याच उत्तम प्रत्यत नागपूर जिल्ह्यातुन पुढे आला आहे. नागपूर जिल्ह्यातील वलनी गावातल्या (Valni Village)  40 महिला दररोज रात्री एक तास गावात गस्त घालतात. हि गस्त का? तर त्यांना गावतील दारू बंद करायची होती. अवैध धंदे व महिलांवर होणार हिंसाचार थांबवायचा होते. यासाठी महिलांनी गावात महिला शक्ती कमांडो दलाची स्थापना (Women Commandos) केली. रात्रीच्या अंधारात ज्यांना घराबाहेर पडायची भीती वाटायची, त्याच महिला आता गावाची सुरक्षा करत आहेत. या महिला कमांडो दलाने गावातील दारूविक्री बंद केली, दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्यांना अद्दल घडविली. काही टवाळकी करणाऱ्या तरुणांना वटणीवर आणलंय. सध्या या धाडसी आणि परिवर्तनी बाब सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Fight Against Illegal Liquor Trade)

Nagpur News : दिवसा शेतातली काम करून रात्री अंधश्रद्धा, बालविवाह, गावातली स्वच्छता, नशामुक्तीवर नारेबाजी

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आधी गावात चार दारूची दुकानं होती. त्यामुळे इतर गावातले लोक पण धुमाकुळ घालायचे. महिला आणि गावातल्या तरुणांच्या पाठिंब्यानं पहिल्यांदा दारू बंद केली. पण, ही दारू पुन्हा सुरू होऊ नये, गावात शांतता राहावी, यासाठी या महिला कमांडो नित्यनेमाने गावात रात्रीला गस्त घालता. यामध्ये स्वतः दारूमुळे पीडित असलेल्या महिलांचाही समावेश आहे. यापैकीच एक म्हणजे जयश्री सोनटक्के. त्यांचा नवरा दारूमुळे वारला आणि त्या महिला कमांडोत सहभागी झाल्या. या महिला कमांडो दिवसभर आपली घरातली, शेतातली काम करून रात्री अंधश्रद्धा, बालविवाह, गावातली स्वच्छता, नशामुक्ती यावर नारेबाजी करत गावात गस्त घालतात. या महिला गस्त घालताना कुठेही यांना अवैध धंदे, नशा दिसली तर त्या ऍक्शन घेतात. त्यांना समजावून सांगतात. ऐकले नाहीतर पोलीस पाटलाला सांगून पोलिसांना बोलवतात. पण, कुठलाही कायदा हातात घेत नाहीत.

Gondia : गावातील महिलांनी टाकली अवैध दारू दुकानावर धाड, मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दरबडा या गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने गावातील सरपंच तमिल टेंभरे यांचे नेतृत्वात शेकडो महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला. गावातीलच दारू विक्रेत्याच्या घरी शेकडो महिला धडकल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी लपविण्यात आलेली जवळपास 100 पव्वे दारू महिलांनी जप्त करत दारू विक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.