Bigg Boss Season 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता (Bigg Boss) सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. त्याच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची बायको संजना चव्हाण (Sanjana Chavan) आई होणार असल्याची चर्चा होती. तिचा बऱ्याच व्हिडीओतून (Social Media) बेबी बंपही दिसला होता. दरम्यान, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण सूरज चव्हाण यानं स्वत: व्हिडीओ शेअर करुन लवकरच वडील होणार असल्याचं सांगितलं. संजना प्रेग्नेंट असून, दोघे लवकरच पालक होणार आहेत. अलिकडेच जान्हवीनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत जान्हवी संजनाची चोर ओटी भरताना दिसत आहे. दरम्यान, जान्हवीच्या व्हिडीओनंतर सूरजने स्वत: व्हिडीओ शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
सूरज चव्हाणने अलिकडेच शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यानं आपल्या झापूक झुपूक स्टाइलमध्ये बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. ही आनंदाची बातमी शेअर करताना सूरज चव्हाणचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सूरज आपल्या व्हिडीओत म्हणतो, 'नमस्कार, जय महाराष्ट्र आज तुमचा सूरज भाऊ खूप खूश आहे. खूप आनंदात आहे. टॉपचा किंग आज बाबा होणार आहे. सूरज चव्हाण देणार धप्पा, टॉपचा किंग होणार पप्पा..येस', असं सूरज चव्हाण आपल्या व्हिडीओत म्हणतो.
सूरज चव्हाणने व्हिडीओत शेअर करत जबरदस्त कॅप्शनही दिलं आहे. 'मी बाबा होणार', असं म्हणत त्यानं व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकरी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करुन दोघांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, काहींनी त्याच्या स्टाईलला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
जान्हवी किल्लेकर सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. अलिकडेच जान्हवीनं सूरज आणि त्याची बायको संजनासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मार्च महिन्यात जान्हवी संजानाची चोर ओटी भरत असल्याचं दिसून येतंय. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमधून सूरज चव्हाण बाबा होणार असल्याचं स्पष्ट केलं. तिनं व्हिडीओ शेअर करत, 'मार्चमध्ये भरलेल्या चोर ओटीचा व्हिडीओ आता शेअर करत आहे. कारण आता कन्फर्म सांगायला काही हरकत नाही. आपला सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे', असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक