अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर व्हावं लागलं आहे.