IND vs AFG : टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
Tv9 Marathi June 13, 2026 03:45 AM

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघ एकमेव कसोटी सामन्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या द्विपक्षीय मालिकेचा 13 जूनपासून श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाने याआधी अफगाणिस्तानवर शुबमन गिल याच्या नेतृत्वात एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाकडून चाहत्यांना अशाच मोठ्या विजयाची आशा असणार आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना शनिवारी 13 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडिया चौथ्या विजयासाठी उत्सूक

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 4 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर उभयसंघातील 1 सामना हा बरोबरीत राहिला होता. त्यामुळे टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध चौथ्यांदा विजयी होण्यासाठी उत्सूक आहे. तर अफगाणिस्तानचा ब्लु आर्मी विरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.