सचिन पिळगावकरांनी पहिल्यांदा किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं, लाडक्या लेकीसाठी पहिला कोणता पदार्थ तयार केला?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 13, 2026 04:43 PM

Sachin Pilgaonkar Made Special Dish: अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) हे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत सिनेमांसह रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. आपल्याला त्यांची कलाकाराची बाजू (Entertainment) माहित पडली. पण सचिन पिळगावकर हे उत्तम शेफ देखील आहेत, हे तुम्हाला ठाऊक होतं का?

लाडकी लेक श्रियासोबत (Shriya Pilgaonkar) सचिन पिळगावकर यांचं वेगळं आणि प्रेमळ बॉण्डिग आहे. त्यांनी आपल्या खास लेकीसाठी चमचमीत पदार्थ केला आहे. श्रियानं देखील आपल्या बाबांनी तयार केलेला पदार्थ आवडीने खाल्ला. सचिन पिळगावकर यांनी आपल्या लेकीसाठी नेमकं कोणता पदार्थ केला, जाणून घेऊयात.

कोण होईल मराठी करोडपती या रिअॅलिटी शोच्या मंचावर सचिन पिळगावकर गेले होते. यात त्यांनी स्वयंपाकघरात नेमका कोणता पदार्थ केला होता? याबद्दलचा किस्सा त्यांनी शेअर केला होता.  सचिन पिळगावकर यांनी सांगितलं की, 'पहिल्यांदा स्वयंपाकघरात गेलो, ते माझ्या मुलीकरीता गेलो. मला स्वयंपाक वगैरे काही बनवता येत नव्हतं. श्रियाने मला सांगितलं की, पप्पा मला भूक लागली आहे. काय करु मला कळत नव्हतं. मी किचनमध्ये पहिल्यांदा घुसलो'.

लेकीसाठी सचिन पिळगावकर बनले शेफ (Sachin Pilgaonkar Made First Dish For Daughter Shriya)

'फ्रिज उघडला, घरात काय आहे काय नाही, काही गोष्टी बाहेर काढल्या.  चिकन होतं तेही बाहेर काढलं. त्याचे तुकडे केले.  मस्तपैकी मी तिच्याकरिता Stir Fried Veges with Chicken in Honey असा पदार्थ तयार केला. भात होता, भात देखील मी गरम केला.  डिशमध्ये चारही बाजूने भात लावला. त्याच्यामध्ये चिकनचं तयार केलेला पदार्थ घातला. वरुन थोडं लिंबू पिळला. आडनावच पिळगावकर आहे. त्यानंतर काटा अन् चमचा तिला दिला. तेव्हा मी घामाघूम झालो होतो मी. आमच्या लक्षाच्या भाषेत घुम झालो घामा...आता म्हटलं तिला खा', असं सचिन पिळगावकर म्हणाले.

यानंतर सचिन खेडेकर यांनी श्रिया पिळगावकर हिला, आता त्यांनी केलेला कोणता पदार्थ तुला आवडतो, तेव्हा श्रिया, 'बाबा सॅलॅड खूप छान बनवतात' असं म्हणते. सध्या सचिन पिळगावकर यांचा कोण होईल मराठी करोडपतीमधील हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

“370 रुपयांची बिर्याणी” पडली महागात, प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती? एका शोमधून किती कमावतो?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.