सावंतवाडी : आंबोली घाटातील मुख्य धबधब्यालगत पूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणी काल सकाळी पुन्हा एक भला मोठा (Amboli Ghat monsoon) दगड थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन, पर्यटक किंवा प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
कोसळलेला दगड रस्त्यावर पडून काही अंतर बाजूला गडगडत गेला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घाटातील दरडप्रवण भागांमध्ये खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
जेसीबीच्या सहाय्याने सदर दगड रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आला. यादरम्यान काही वेळ दोन्ही बाजूने वाहनांच्या रागा लागल्या होत्या. यावेळी येथील पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलिस हवालदार संतोष गलोले, पोलिस हवालदार काळे, पोलिस हवालदार जाधव, पोलिस हवालदार चव्हाण, पोलिस हवालदार निरवडेकर, पोलिस नाईक परब आदी उपस्थित होते.
Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडलीदरम्यान, यावर्षी माॅन्सूनचा पाऊस अजून मोठ्या प्रमाणावर सुरू झाला नसल्याने आंबोली घाटातील धबधबे प्रवाहित झाले नाहीत. अन्यथा याठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.