Latest Marathi News Live Update : अभिजित दिपकेंना मारहाण
esakal June 15, 2026 08:45 PM
अभिजित दिपकेंना मारहाण

क्रॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

Nashik Live: भाजप शहराध्यक्षांनी चालवली बस, भितींला धडक

नाशिकः मतदारांच्या सहलीला निघालेल्या भाजप नगरसेवकांना हॉटेल आवारातच बसला झटका

- अतिउत्साहात शहराध्यक्ष सुनील केदार बसच्या ड्रायव्हिंग सीटवर

- ड्रायव्हरला उतरवून स्वतः बसचे स्टेअरिंग घेतले होते हाती

- बस सुरू होताच हॉटेलच्या भिंतीला दिली धडक, अपघातात बसचे किरकोळ नुकसान

- मतदारांना मार्गदर्शन सहलीवर नेताना शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगची रंगली चर्चा

- निवडणुकीआधीच महायुतीच्या सहल रणनीतीला धक्का लागल्याची कुजबुज

Washim Live : शेतकऱ्यांनी केली शासनाच्या कर्जमाफी आदेशाची होळी 

वाशीमच्या मंगरूळपीर इथ राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी व शर्तींविरोधात शेतकरी आक्रमक होत,शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवेदनानंतर संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी आदेशाची होळी करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...

नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनाचे नेतृत्व करणार असून NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे प्रभावित विद्यार्थी सहभागी होणार. आंदोलनात नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

- विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजची सुनावणी पार पडली.

- नवनियुक्त न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या समोर आजची सुनावणी पार पडली.

- आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर वकिलांकडून युक्तिवाद झाला.

Ganesh Naik: वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची टीका

गणेश नाईक कुद्र्या मनाचे अल्पसंतुष्ट माणूस, हा माणूस भाजपाचा निष्ठावंत नाही. मनोहर जोशी यांचे सरकार पडण्यासाठी पवारांना सुद्धा मदत केली होती.माजी आमदार शहाजी पाटील यांनी डागली तोफ. ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळल्याने शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे आक्रमक झाले आहेत त्यांनी भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर शेलक्या या शब्दात टीका केली आहे. एक दिवस गणेश नाईक नवी मुंबई राजकारणातून संपलेले दिसतील.

Nagpur Live: नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनाचे नेतृत्व करणार असून NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे प्रभावित विद्यार्थी सहभागी होणार.

- आंदोलनात नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Navi Mumbai: नवी मुंबईत अधिकाऱ्यासमोर शिवसैनिकांनी निमंत्रण पत्रिका फाडली

नवी मुंबईत अधिकाऱ्यासमोर शिवसैनिकांनी निमंत्रण पत्रिका फाडली

शिवसैनिकांचं आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

Dhule News: धुळेकरांचे मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाची 50 वर्षांचे स्वप्न पूर्णत्वाकडे

धुळे जिल्ह्याचे गेल्या 50 वर्षांपासूनचे प्रलंबित स्वप्न असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून जवळपास एक ते दीड वर्षात धुळेकरांना बाळापुर ते फागणे या मार्गाचा उपभोग प्रत्यक्षात घेता येणार असल्याचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा माजी खासदार सुभाष भामरे यांनी या मार्गाची प्रत्यक्षात पाहणी करतेवेळी स्पष्ट केले आहे. आज बाळापूर-फागणे परिसरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानक आणि ट्रॅकच्या कामाची आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.

धुळे जिल्ह्याच गेल्या जवळपास 50 वर्षांपासूनच राजकारण हे इंदोर मनमाड रेल्वे मार्गाच्या भोवती फिरत असून, प्रत्येक निवडणुकीमध्ये इंदोर मनमाड रेल्वे मार्गाचा मुद्दा हा प्रचारासाठी मुख्य मुद्दा बनविला जात होता, परंतु आता इंदोर मनमाड रेल्वे मार्ग प्रत्यक्षात जवळपास एक ते दीड वर्षात धुळेकरांना अनुभवता येणार आहे.

Maharashtra Rain: पुढील ४-५ दिवस संपूर्ण राज्यात वादळी वारे आणि पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने पुढील ४-५ दिवस संपूर्ण राज्यात वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. जयपूर हवामान केंद्राचे संचालक राधेश्याम शर्मा म्हणतात, "राज्यावर सध्या चक्रीवादळाची स्थिती (सायक्लोनिक सर्क्युलेशन) कायम आहे आणि अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आर्द्रता येत आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मान्सूनपूर्व हालचालींमुळे अनेक भागांत वादळे आणि पाऊस झाला आहे... राज्याच्या काही भागांत पुढील ४ ते ५ दिवस वादळे आणि पावसाचे सत्र सुरू राहण्याची शक्यता आहे... १७ ते २१ जून दरम्यान वादळे आणि पावसाची दाट शक्यता आहे... या हवामान बदलांमुळे तापमानात आणखी २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची अपेक्षा आहे... तसेच, आगामी काळात उष्णतेची लाट (हीटवेव्ह) येण्याची शक्यता नाही..."

मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका, बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

मुंबईत सुरू असलेल्या विविध मेट्रो प्रकल्पांच्या कामांमुळे बेस्ट परिवहन उपक्रमाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे. मेट्रोच्या कामांदरम्यान शहरातील अनेक ठिकाणचे बेस्ट बस थांबे हटवण्यात आणि तोडण्यात आले आहेत. हे थांबेच नष्ट झाल्याने जाहिरात उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यामुळे उपक्रमाचे सुमारे ४० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज बेस्ट समितीचे सदस्य डॉ. नितीन नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Tandulwadi Accident : पंढरपूर अपघात प्रकरणी ठेकेदारासह देखरेख करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पंढरपूर अपघात प्रकरणी ठेकेदारासह देखरेख करणार्या लोकांवर गुन्हा दाखल माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे काल झालेल्या‌ अपघात प्रकरणानंतर नवज्योत गडोख राहणार पुणे आणि रस्त्याच्या कामात सहभागी असणारे व देखरेख करणारे सर्व संबंधित इसम यांच्यावर वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा व निष्काळजी पणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Chhatrapati Sambhajinagar संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी काग्रेसकडून आंदोलन, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आक्रमक, पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात.

Kolhapur News मनोज जरांगे पाटील खासदार शाहू महाराजांच्या भेटीला

मनोज जरांगे पाटील खासदार शाहू महाराज यांच्या भेटीला नवीन राजवाडा इथं मनोज जरांगे पाटील यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची घेतली भेट मराठा आरक्षणासह राज्यातील विविध मुद्द्यांवर खासदार शाहू महाराज यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू

Nashik Live: नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पांझन नदीवर मध्यम प्रकल्प असलेल्या नागा-साक्या धरणाने तळ गाठायला सुरुवात

सध्या धरणात पाण्याचा 15 टक्के पेक्षा कमी पाणी साठा उरला आहे.

एकीकडे धरणातील पाणी साठा संपुष्टात येण्याच्या मार्गांवर असून दुसरीकडे पाऊस देखील लांबल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या नांदगाव, मालेगावसह 56 खेडी पाणी पुरवठा योजनेवर पाणी टंचाईची टांगती तलवार

CM Live: शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

आजपासून राज्यभरात शाळा सुरू

शाळेच्या पहिल्याच दिवशी पनवेलमधील वहाळ शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद

Kolhapur Live: कोल्हापूर दौऱ्यात मनोज जरांगेंकडून अंबाबाईचे दर्शन

आज कोल्हापूर दौऱ्यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांना न्याय मिळूदे यासाठी देवीला साकडं घातल्याच त्यांनी सांगितलं

Pune live : पुण्यात आजपासून पाणी कपात

मान्सूनचा पाऊस लांबल्याने धरणांतील पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे पुण्यात आजपासून पाणी कपात करण्यात आली असून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

Pune Live : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेचा प्रवेशोत्सव सोहळा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कान्हे येथील आदर्श जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशोत्सव सोहळा पार पडत आहे.

Devgad Weather : देवगड किनारी भागात पावसाची हुलकावणी

देवगड : तालुक्याच्या किनारी भागात पावसाची हुलकावणी आहे. अमावास्या असल्याने पाऊस कोसळेल, असा शेतकऱ्यांचा पारंपरिक ठोकताळा होता. मात्र, दिवसभरात पाऊस तर झालाच नाही, उलट कडक उन्हाचे चटके बसत होते. दरम्यान, पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. किनारी भागात मॉन्सूनचा प्रवेश झाला खरा; मात्र त्यामध्ये सातत्य नसल्याने हवेतील उष्णता कायम आहे. गेले काही दिवस पावसाची हुलकावणी आहे. त्यामुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे.

Kudal News : तेंडोली येथे आज दशावतार नाटकाचे आयोजन

कुडाळ : तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने श्री देव रवळनाथ पंचायतन येथे आज (ता.१५) रात्री ७.३० वाजता ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ हे काल्पनिक संयुक्त दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महागणपती-प्रथमेश मेस्त्री, रिद्धी सिध्दी-सखाराम परब, चंडोल-दामोदर जोशी, आई-सुधीर तांडेल, श्याम-हरिश्चंद्र गांवकर, नवरा-काका कलिंगण, सुंदर-गिरिश राऊळ, कुंदन-संजय पाटील, राजा-संजय वालावलकर, शुभांगी-नितीन घाडी, आचार्य-यशवंत तेंडोलकर सहभाग घेणार आहेत.

ST Employees Andolan : एसटी कर्मचाऱ्यांचे आज काळ्या फिती लावून आंदोलन

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व महागाई भत्त्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा’च्या वतीने आज (ता. १५) राज्यभरात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन पूर्णपणे प्रतीकात्मक स्वरूपाचे असून, कर्मचारी आपले दैनंदिन कर्तव्य बजावूनच हा निषेध नोंदवणार आहेत. त्यामुळे राज्यातील एसटीची वाहतूक नियमित सुरू राहील व प्रवाशांना त्रास होणार नाही, अशी माहिती विभागीय अध्यक्ष बलभीम पारखे यांनी दिली.

Schools in Maharashtra : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार;  चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

बांदा : दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे आजपासून (ता. १५) जिल्ह्यातील शाळांचे बंद दरवाजे पुन्हा उघडणार असून, शांत असलेल्या वर्गखोल्या आणि अंगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने, गप्पागोष्टींनी आणि किलबिलाटाने भारून जाणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळा सजल्या असून, विशेषतः पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरणार आहे. पहिल्यांदाच शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांच्या मनात उत्सुकता, आनंद, कुतूहल आणि थोडीशी धास्तीही असते. आई-वडिलांचा हात घट्ट धरून शाळेत येणाऱ्या या लहानग्यांना प्रेमाने, आपुलकीने आणि आनंदाने सामावून घेण्यासाठी शिक्षकांनी विशेष तयारी केली आहे.

Pandharpur Accident : : पंढरपूरकडे परतत असताना भाविकांवर काळाचा घाला; तांदूळवाडीत पिकअप विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

Latest Marathi Live Updates 15 June 2026 : गोंदवले व म्हसवड येथील देवदर्शन करून मूळ गावी पंढरपूरकडे (इसबावी) परतत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांना घेऊन जाणारे मालवाहू वाहन (पिकअप) माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी हद्दीत रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळून पंधरापैकी आठ भाविकांचा मृत्यू झाला. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.