पर्सनल लोनचा ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी मासिक परतफेडीचा अंदाज घेण्यास मदत करतो. कर्जविषयक विविध कालावधी आणि ईएमआय रकमेची तुलना करून, तुम्ही स्वत:च्या अंदाजपत्रकात आरामात बसणारी आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना आधार देणारी परतफेड योजना निवडू शकता.
थोडक्यात
तुम्ही पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर का वापरला पाहिजे?
पर्सनल लोन घेण्यापूर्वी, तुम्ही दर महिन्याला किती परतफेड कराल हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला तुमच्या मासिक हप्त्यांचा अंदाज सेकंदात देऊन आगाऊ योजना आखण्यात मदत करतो.
अंदाजावर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही कॅलक्युलेटरचा वापर यासाठी करू शकताः
तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी, घराचे नूतनीकरण करण्यासाठी, प्रवासाकरिता, उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी निधीची गरज म्हणून, पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला कर्ज घेण्याचे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतो.
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर कसा करावा
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर वापरणे सोपे आहे आणि त्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात.
पायरी 1: लोन रक्कम प्रविष्ट करा
तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करून सुरुवात करा. ही रक्कम तुमच्या वास्तविक आर्थिक गरजेशी जुळली पाहिजे.
पायरी 2: व्याज दर प्रविष्ट करा
पुढे, तुमची पात्रता आणि कर्जदाराच्या मूल्यांकनाच्या आधारे लागू असलेला व्याज दर प्रविष्ट करा.
पायरी 3: रिपेमेंट कालावधी निवडा
तुमच्या बजेटला साजेसा परतफेडीचा कालावधी निवडा. ईएमआयमध्ये कसे बदल होतात हे पाहण्यासाठी तुम्ही अनेक मुदतीच्या पर्यायांची चाचणी घेऊ शकता.
पायरी 4: विविध परिस्थितीसह तुलना करा
विविध मुदतीच्या पर्यायांखाली ईएमआय रकमेचा आढावा घ्या. यामुळे तुम्हाला प्रत्येक परतफेडीच्या कालावधीचा परिणाम समजण्यास मदत होते.
पायरी 5: सुखकर रिपेमेंट प्लानची निवड करा
तुमच्या इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना तुम्हाला तुमचा ईएमआय आरामात व्यवस्थापित करता येईल अशी मुदत निवडा.
कर्जविषयक मुदतीचा तुमच्या ईएमआयवर कसा परिणाम होतो
तुम्ही निवडलेल्या रिपेमेंट किंवा परतफेडीच्या मुदतीचा थेट परिणाम तुमच्या मासिक ईएमआयवर आणि कर्जाच्या कालावधीत तुम्ही भरलेल्या एकूण व्याजावर होतो.
जर तुम्ही कमी कालावधीची मुदत निवडली, तर कर्जाची जलद परतफेड करू शकता आणि एकूण व्याज खर्च कमी करू शकता. मात्र, तुमचा मासिक ईएमआय जास्त असेल. तुम्ही दीर्घ मुदतीची निवड केल्यास, तुम्ही तुमचा मासिक ईएमआय कमी करू शकता आणि त्वरित परतफेडीचा दबाव कमी करू शकता. तथापि, तुम्हाला संपूर्ण कर्जाच्या कालावधीत अधिक व्याज भरावे लागेल.
पर्सनल लोनचा ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला या पर्यायांची तुलना करण्याची आणि परतफेडीची सर्वात योग्य रचना निवडण्याची परवानगी देतो.
प्रसंग: कर्जविषयक योग्य कालावधी निवडताना
नेहाचे उदाहरण पहा, ती एक पगारदार व्यावसायिक आहे आणि तिचे दरमहा उत्पन्न रु. 90,000 आहे. तिच्या घराच्या नूतनीकरणासाठी रु. 10 लाख कर्जाऊ घेण्याची तिची योजना असून तिला परवडणारा आणि परतफेडीची कार्यक्षमता संतुलित करणारा कार्यकाळ शोधायचा आहे.
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करून ती खालील पर्यायांची तुलना करते:
|
रु. 10 लाख |
3 वर्षे |
रु. 33,214 |
|
|
रु. 10 लाख |
5 वर्षे |
रु. 22,244 |
|
|
रु. 10 लाख |
8 वर्षे |
रु. 16,253 |
पर्यायांची तुलना केल्यानंतर, नेहा 5 वर्षांचा कार्यकाळ निवडते कारण तो दीर्घ परतफेडीचा कालावधी टाळत व्यवस्थापित करण्यायोग्य ईएमआय उपलब्ध करून देतो. पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर केल्याशिवाय, ही तुलना करणे अधिक कठीण झाले असते.
तुम्हाला कितपत ईएमआय आरामात परवडू शकतो?
कर्जाची मुदत निवडताना तुम्ही तुमच्या एकूण आर्थिक बांधिलकीचा विचार केला पाहिजे.
आपल्या एकूण ईएमआय आपल्या मासिक उत्पन्नाच्या 40% ते 50% च्या आत ठेवण्याची शिफारस केली जाते. यामुळे तुम्हाला तुमचे दैनंदिन खर्च, बचतीची उद्दिष्टे आणि अनपेक्षित खर्च आरामात व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते.
ईएमआय खूप जास्त वाटत असल्यास, तुम्ही विचार करू शकता:
पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला या पर्यायांची त्वरित चाचणी घेण्यास मदत करतो.
कर्ज पुरवठादार तुमचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी ज्या घटकांचा विचार करतात
तुमचा अर्ज मंजूर करण्यापूर्वी, कर्ज पुरवठादार सामान्यतः कर्जाची परतफेड (रिपेमेंट) करण्याच्या तुमच्या क्षमतेचे मूल्यांकन करतात.
ईएमआय नियोजनास आधार देणारी बजाज फायनान्स पर्सनल लोनची वैशिष्ट्ये
एकदा तुम्ही पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करून सुखकर ईएमआय ओळखला की, परतफेडीसाठी लवचिक पर्याय उपलब्ध करून देणारा कर्ज पुरवठादार निवडणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. बजाज फायनान्स पर्सनल लोन परतफेडीची लवचिकता देते. ज्यामुळे तुमचा ईएमआय तुमच्या उत्पन्नाशी आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते.
बजाज फायनान्स पर्सनल लोनकरिता कोण अर्ज करू शकतील?
खालील निकषांची पूर्तता केल्यास तुम्ही अर्ज करण्यास पात्र ठरू शकता:
|
21 वर्षे ते 80 वर्षे* |
|
|
सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र किंवा बहुराष्ट्रीय कंपनीतील कर्मचारी |
|
|
650 किंवा अधिक |
|
तुमच्या आर्थिक प्रोफाइल आणि कर्जदाराच्या मूल्यांकनावर अवलंबून पात्रता बदलू शकते.
बजाज फायनान्स पर्सनल लोनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या सोप्या क्रमांचे अनुसरण कराः
एक प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल आणि उर्वरित प्रक्रियेत तुम्हाला मार्गदर्शन करेल.
कर्ज घेण्यापूर्वीची यादी
अर्ज करण्यापूर्वी, तुमच्याकडे असल्याची खात्री करा:
तुमच्या बजेटला साजेशा मुदतीची निवड
पर्सनल लोन तुम्हाला तुमच्या योजनांना विलंब न करता महत्त्वाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करू शकते. तथापि, कर्जाची रक्कम निवडण्याइतकीच परतफेडीची योग्य मुदत निवडणे देखील महत्त्वाचे आहे.
पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर तुम्हाला परतफेडीच्या पर्यायांची तुलना करण्यास, मासिक हप्त्यांचा अंदाज लावण्यास आणि तुमच्या अंदाजपत्रकानुसार काम करणारा कालावधी ओळखण्यास मदत करतो. तुमच्या ईएमआयचे आगाऊ नियोजन करून तुम्ही अधिक आत्मविश्वासाने कर्ज घेऊ शकता आणि अनावश्यक आर्थिक ताण टाळू शकता.
कर्जाची रक्कम रु. 40,000 ते रु. 55 लाख, परतफेडीचा कालावधी 12 महिने ते 108 महिने, त्वरित मंजुरी, 24 तासांत* वितरण, तारण किंवा हमीची आवश्यकता नाही आणि किमान कागदपत्रे,बजाज फायनान्स पर्सनल लोन तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असलेली परतफेड योजना निवडण्याची लवचिकता देते. तर मग वाट का बघायची? आत्ताच अर्ज करा!
अटी आणि नियम लागू.
Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.