Pooja Sawant Movie: मराठी सिनेमात 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) आणि 'देऊळ बंद 2' (Deool Band) सिनेमानंतर मराठी सिनेसृष्टीत आणखी एका सिनेमाची विशेष चर्चा आहे. 'कप बशी' या सिनेमाचा धमाकेदार (Pooja Sawant) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियातही रिलीज झाला आहे. आई, मुलगा आणि होणारी सून यांच्या एव्हरग्रीन नात्याची ट्विस्टेड गोष्ट "कप बशी" या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा याच महिन्यात म्हणजेच 19 जून (Cup Bashi) रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
'कप बशी' हा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ऋषी मनोहर आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने "कप बशी" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तसेच बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश रामगोपाल राठी यांनी या सिनेमाची प्रस्तूती केलीये.
या धमाकेदार सिनेमाचे दिग्दर्शन वैभव रामकृष्ण चिंचाळकर यांनी केले आहे. तर, चित्रपटाची पटकथा , संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिले आहे. या सिनेमाचे गीत गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे. तर, नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन महेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी या सिनेमासाठी काम पाहिले आहे. या सिनेमा ऋषी मनोहर आणि पूजा सावंत व्यतिरिक्त निर्मिती सावंत, नयना आपटे, अनंत जोग, आनंद इंगळे, आनंद काळे, राहुल रानडे, चिन्मय शिंत्रे ,उमा सरदेशमुख यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची महत्त्वाची भूमिका आहेत.
या सिनेमात लग्न जुळवण्यापूर्वी तरुणी वेगळी अट घालते. लग्न जमवण्याआधी पत्रिका जुळणं खूप महत्त्वाचं असतं. पण तरुणी नवऱ्याऐवजी त्याच्या आईशी पत्रिका जुळण्याची अट घालत असते. तरुणीनं आगळी वेगळी अट घातल्यामुळे, या सिनेमात नेमकं काय काय धम्माल किस्से घडतात? हे सिनेरसिकांना चित्रपटातून पाहायला मिळेल. या सिनेमाच्या ट्रेलरची विशेष चर्चा होत आहे. हा सिनेमा 19 जून रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
गाजलेल्या मालिका अन् सिनेमांमध्ये झळकली, तरीही संचिता उगलेनं टोकाचं पाऊल का उचललं? नक्की काय घडलं?