AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अजित पवार अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे आदेश
Tv9 Marathi June 16, 2026 01:45 AM

२८ जानेवारी रोजी अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले होते. या प्रकरणात हायकोर्टाने आज महत्वाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात AAIB चा अंतिम अहवाल येत नाही तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाही असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा पाठपुरावा अजितदादा यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी लावून धरला आहे. आता हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांची काय प्रतिक्रीया येते याकडे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या दोन याचिका मागे घेण्यात आल्या आहेत. कारण, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात AAIB चा अंतिम अहवाल नाही, तोवर कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे म्हटले आहे. त्यामुळे या दोन याचिकांना मागे घेण्यात आल्या आहेत. या याचिकाकर्त्यांना पुन्हा दाद मागण्याची मुभा देण्यात आली असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

तर आम्ही पुन्हा न्यायालयात येणार…

जोपर्यंत AAIB दिल्ली यांचा अंतिम अहवाल येत नाही, जोपर्यंत तपास चालू आहे. त्यांच्याकडून तपासातून काही निष्कर्ष पुढे येत नाही आणि अहवाल पुढे येत नाही, तोपर्यंत आम्ही काय करु शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढे जे काही येईल त्यानंतर आम्ही तुमच्या केसचा विचार करु असे माननीय न्यायालय बोललेले आहे. त्यामुळे आम्ही आता AAIB दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा करु आणि AAIB दिल्ली यांनी जर दोन महिन्यात अहवाल पाठविला नाही तर आम्ही पुन्हा न्यायालयात येणार आहोत असे यावेळी याचिकादाराच्या वकीलांनी स्पष्ट केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.