प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
अंकिता खाणे June 16, 2026 05:43 PM

नागपूर: भारतीय वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या २४ वर्षीय पत्नीसोबत नागपुरात रूह हादरवून टाकणारी घटना (Nagpur Crime News) घडल्याचे समोर आले आहे. पीडितेचा छळ करून, तिला ब्लँकमेल करत तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले आणि त्यानंतर "आता तू मुसलमान झाली आहेस," असे सांगत तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात (Nagpur Crime News) आला. हा प्रकार वर्षभरापूर्वीचा असला, तरी पीडितेने नुकतीच आपल्या पतीला याची माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Nagpur Crime News)

Nagpur Crime News: सोशल मीडियावरील 'तो' धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये २४ वर्षांची एक तरुणी मोठ्याने ओरडताना आणि रडताना दिसत आहे, तर तिचा जुना वर्गमित्र (क्लासमेट) अयाज ताज मदारे हा जबरदस्तीने तिचे हात पकडून बसला आहे. मदारे हा कुराणमधील आयती वाचून त्या तरुणीवर फुंक मारताना दिसत आहे, तर महिला स्वतःला सोडवण्यासाठी सातत्याने ओरडत आहे. "या अघोरी कृत्यानंतर त्यांनी मला मुसलमान घोषित केले आणि माझ्यावर पुन्हा अत्याचार केले," असा आरोप पीडितेने केला आहे.(Nagpur Crime News)

Nagpur Crime News: काय आहे नेमके प्रकरण? 

पीडित महिला नागपुरात प्रॉपर्टी डीलिंगचे काम करते, तर तिचे पती भारतीय वायुसेनेत अधिकारी असून सध्या दुसऱ्या शहरात तैनात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५: आरोपी अयाज ताज मदारे याने प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने पीडितेशी संपर्क साधला आणि तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे त्याने पीडितेला गुंगीचे औषध मिसळलेले ज्यूस पाजले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि त्या कृत्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ बनवले. या अश्लील व्हिडिओंच्या जोरावर अयाजने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला आणि तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल ३.०९ लाख रुपये उकळले.

Nagpur Crime News: अघोरी कृत्य आणि जबरदस्तीने धर्मांतर

पीडितेने तक्रारीत नमूद केल्यानुसार, मे २०२५ मध्ये आरोपी अयाज तिला नागपूरच्या कलमेश्वर भागात घेऊन गेला. तिथे तिची भेट अमीन शेख आणि मध्य प्रदेशातील तामिया येथील हजरत मौलाना नावाच्या व्यक्तीशी करून देण्यात आली. हे तिघेही पीडितेला एका निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी काही धार्मिक विधी आणि अघोरी कृत्य केले आणि "तुझे धर्मांतर पूर्ण झाले असून तू आता मुसलमान झाली आहेस," असा दावा केला. यानंतरही तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Nagpur Crime News: दोन आरोपी अटक, काळ्या जादूसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वीच पीडितेचे पती कर्तव्यावरून सुट्टी घेऊन घरी परतले. सासरच्या आणि पतीच्या पाठिंब्यानंतर पीडितेने त्यांना या सर्व भयानक प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तातडीने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली असून, मुख्य आरोपी अयाज ताज मदारे आणि अमीन शेख या दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी हजरत मौलाना (रा. तामिया, मध्य प्रदेश) हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अंतर्गत बलात्कार, खंडणी वसूल करणे, जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणे यासह 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा' नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.