अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाझ खान याच्या सोबत कोलकाता येथे एक विचित्र प्रसंग गुदरला आहे.ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकले आहे. एका क्षणाला अरबाझ खान याला देखील प्रश्न पडला अखेर हे काय होत आहे. वास्तविक, अरबाझ एका इव्हेंटमध्ये सामील होण्यासाठी कोलकाता येथे गेला होता. तो इव्हेंटनंतर बाहेर आला तर त्याच्या कारमध्ये एक व्यक्ती जबरदस्ती घुसून बसल्याचे दिसला.
हा व्यक्ती कारमधून बाहेर यायलाच तयार नव्हता. तेथे मोठी गर्दी उसळली. त्यानंतर बॉडीगार्डसने त्याला जबरदस्ती कारमधून खेचून काढले आणि त्याची धुलाई केली. जेव्हा बॉडीगार्ड्सने या व्यक्तीला कारच्या बाहेर काढले तेव्हा तेथील उपस्थित लोकही ओरडले की त्या व्यक्तीला मारा..मारा…हे पाहून अरबाझला देखील समजले नाही नक्की काय भानगड आहे.तो कन्फ्युज झाला, त्यावेळचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्यक्ती सुरक्षा घेरा तोडून त्या घराकडे पोहचला. कारच्या जवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला आणि त्यात जाऊन आरामात बसला होता. हे सर्व इतके अचानक झाले की अरबाझ देखील घाबरुन गेला होता. मात्र, सिक्युरिटी टीमने सर्वकाही कंट्रोलमध्ये केले. त्यानंतर अरबाझ याला कारमध्ये बसून त्याला सहीसलामत रवाना करण्यात आले.
येथे पोस्ट पाहा…
Makhanchand “Makkhi” Prajapati Pandey Akka #Arbaazkhan Craze At #Kolkata
#Salmankhan #Maatrubhumi pic.twitter.com/iek1aArNC2
— R gulati (@ritesh272727) June 15, 2026
अरबाझ बॉलीवूडचे एक मोठे नाव आहे. तो ३० वर्षांपासून फिल्म इंड्स्ट्रीचा भाग आहे. तो अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही काम करतो. वर्कफ्रंटचे बोलायचे झाले तर अरबाझची शेवटचा चित्रपट ‘बिहू अटैक’ मध्ये पाहिले गेले होत. सुजाद इक्बाल खान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १६ जानेवारी रोजी रिलीज झाला होता. हा एक एक्शन ड्रामा चित्रपट होता. डेझी शाह आणि राहुल देव देखील या चित्रपटाचा हिस्सा आहेत.