इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील ही 3 सामन्यांची कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत खेळवण्यात येत आहे. यजमान इंग्लंडने या मालिकेत बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या सामन्यात चौथ्याच दिवशी न्यूझीलंडला पराभूत केलं. इंग्लंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 17 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना 17 ते 21 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
इंग्लंडला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडसाठी हा सामना करो या मरो असा आहे. न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे.
इंग्लंड या दुसऱ्या कसोटीत नियमित कर्णधार बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत जो रुट नेतृत्व करणार आहे. नाईट क्लब प्रकरणामुळे बेन स्टोक्स आणि गस एटकीन्सन या दोघांना टीमपासून दूर ठेवण्यात आलं आहे.
इंग्लंडने या सामन्यासाठी सोमवारी 15 जून रोजी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल केले आहेत. बेन स्टोक्स याच्या जागी जॉर्डन कॉक्स याचा समावेश करण्यात आला आहे. तर गस एटकीन्स याच्या जागी जोफ्रा आर्चर याचा समावेश केला गेला आहे. जॉर्डन कॉक्स आणि सोनी बेकर या दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड इंग्लंडला सलग दुसरा सामना जिंकण्यापासून रोखत मालिकेत बरोबरी साधणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.