IAS Transfer : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील 12 बड्या सनदी अधिकाऱ्याची बदल्या करण्यात आल्या आहेत. आयएएस अधिकारी विजय सिंघल यांच्यासह, अश्विनी जोशी, दीपेंद्रसिंग कुशवाह, अश्विन मुदगल, वेलारसू यासारख्या बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा यात समावेश आहे. कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली झाली याबाबतची माहिती पाहुयात.
1.श्री विजय सिंघल VCMD, CIDCO, मुंबई यांची विशेष कर्तव्य अधिकारी धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
2. श्रीमती प्राजक्ता वर्मा यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. श्री पी.वेलरासू मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांची सचिव (वन), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. डॉ. अश्विनी जोशी अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. श्री दीपेंद्र सिंह कुशवाह विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. श्री अश्विन मुदगल अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई यांची VCMD, CIDCO, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉ. कादंबरी बलकवडे आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, NHM, मुंबई यांची विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. श्री संजय काटकरव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, NHM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. श्री जेनिथ चंद्रा डोनथुला PO, ITDP, किनवट आणि सहायक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
10. श्री अनय नावंदर PO, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. डॉ. बी. सरावनन सहाय्यक जिल्हाधिकारी, भोखरदन उपविभाग, जालना यांना PO, ITDP, किनवट आणि सहायक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
12. श्रीमती लघिमा तिवारी सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडप्री उपविभाग, चंद्रपूर यांना PO, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.