एचएमडीचा नवीन स्मार्टफोन HMD Vibe 2 5G गेल्या महिन्यात 4GB/64GB आणि 4GB/128GB या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता. अशातच या फोनच्या वाढत्या मागणीनुसार भारतीय बाजारपेठेत या कंपनीचा 16 जून रोजी दुपारी 12 वाजता 6GB/128GB व्हेरिएंट लाँच केला आहे. त्यात हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध देखील केला आहे. जर तुम्ही 15 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीचा 5जी फोन शोधत असाल, तर तुम्हाला हा फोन 6000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि एचडी रिझोल्यूशन डिस्प्लेसह खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण 6GB/128GB व्हेरिएंट असलेल्या HMD Vibe 2 5G ची किंमत जाणून घेऊयात.
HMD Vibe 2 5G या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16 हजार 999 रूपये आहे. बँक ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर तुम्हाला हा फोन 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे, म्हणजेच तुम्ही हा फोन 2 हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करू शकाल.
या डिव्हाइसचा 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. HMD Vibe 2 5G चा 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 14 हजार 999 मध्ये उपलब्ध आहे, पण 2 हजार रूपयांच्या बँक कार्ड डिस्काउंटनंतर तो तुम्हाला 12 हजार 999 मध्ये खरेदी करता येणार आहे. SBI, HDFC, ICICI आणि Axis बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास डिस्काउंट उपलब्ध आहे. हा फोन OPPO K14x 5G, POCO M7 Plus 5G आणि Realme P4 Lite 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.