सोलापूर: कर्नाटकातील चडचण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी भीषण रस्ता अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. बरडोल-लोणी फाटा परिसरात मंगळवारी (ता. १६) सकाळी केएसआरटीसी बस आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टिपरची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २७ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विजयपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीरया धडकेत बसचालक हणमंत चलवादी (वय ३८, रा. निडगुंदी), टिपर चालक अशोक महादेव उटगी (वय ३२) आणि त्यांची पत्नी राधाबाई अशोक उटगी (वय २८, रा. हविनाळ, ता. चडचण) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राज्य महामार्ग क्रमांक ४१ वर हा अपघात घडला. विजयपूर आगाराची बस (केए २८ एफ-२४६८) सुमारे ५० प्रवाशांना घेऊन चडचणहून बदामीकडे जात होती.
त्याचवेळी झळकीकडून चडचणकडे सिमेंट घेऊन निघालेल्या टिपरचा (केए-२८ एए-६७९२) टायर अचानक फुटला, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून टिपर विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेला आणि समोरून येणाऱ्या बसवर आदळला. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. जखमीमध्ये ६ पुरुष, १८ महिला आणि ३ मुलांचा समावेश असून सर्वांना चडचण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारांसाठी विजयपूरला पाठविण्यात आले.
आरटीओ यंत्रणा नसल्यानं धोकाचडचण तालुक्यात स्वतंत्र आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्यामुळे वाहन तपासणी व वाहतूक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने, विम्याविना धावणारी वाहने, परवान्याशिवाय वाहन चालविणारे चालक आणि अल्पवयीन वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चडचण येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व ज्येष्ठांकडून करण्यात येत आहे.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. नागरिकांत भीतीसोमवारी (ता. १५) मरगूर साखर कारखान्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांत चडचण तालुक्यात आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.