टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशन याने अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक (Ishan Kishan Century) झळकावलं आहे. इशानने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये पहिल्या डावात शतक ठोकलं. चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या इशानने कर्णधार शुबमन गिल याच्यासह मोठी भागीदारी केली. या दरम्यान इशानने शतक ठोकलं. इशानने नक्की किती चेंडूत शतक केलं? हे जाणून घेऊयात.
इशान आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेनंतर टीम इंडियातून बाहेर होता. मात्र इशानने या मालिकेतून भारतीय संघात कमबॅक केलं. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इशान चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. इशानने त्याच्या खेळीतील पहिल्या 50 धावांसाठी 52 चेंडूंचा सामना केला. त्यानंतर इशानने पूर्ण चित्रच बदललं. इशानने अर्धशतकानंतर पुढील 19 बॉलमध्ये 53 रन्स ठोकल्या. इशानने अशाप्रकारे फक्त 71 चेंडूत शतक पूर्ण केलं. इशानच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं
इशानने या शतकासह खास कामगिरी केली. इशान अफगाणिस्तान विरुद्ध वेगवान शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. इशानने या शतकी खेळीत 4 षटकार आणि 14 चौकार लगावले. इशानने शतकानंतर फटकेबाजी सुरुच ठेवली होती. त्यामुळे इशानला सहज दीडशतक करण्याची संधी होती. मात्र इशान शतकानंतर जास्त वेळ मैदानात टिकून खेळण्यात अपयशी ठरला. इशानला शतकानंतर फक्त 25 धावाच जोडता आल्या. इशानने 79 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 14 फोरसह 125 रन्स केल्या.
इशानने 33 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून शतक पूर्ण केलं. त्याआधी याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कॅप्टन शुबमन गिल याने शतक झळकावलं. शुबमनने एकदिवसीय कर्णधार म्हणून 77 चेंडूत पहिलंवहिलं शतक ठोकलं.
तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी
Continuing along their merry way
2⃣0⃣0⃣-run stand up between Shubman Gill and Ishan Kishan’s partnership
3⃣0⃣0⃣ up for #TeamIndia
Updates https://t.co/JYJ5l44iJ6#INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 | @ShubmanGill pic.twitter.com/ROmwXqigcD
— BCCI (@BCCI) June 17, 2026
दरम्यान शुबमन आणि इशान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर इशान किशन मैदानात आला. तेव्हा भारताची स्थिती 13.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 96 अशी होती. त्यानंतर इशान आणि शुबमन या दोघांनी 140 बॉलमध्ये 224 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र इशान आऊट होताच ही भागीदारी मोडीत निघाली.