जी-७ परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी होर्मुजची सामुद्रधुनी सुरु करणं जगातील अनेक देशांसाठी आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. शिवाय भारतीय नाविकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचंही त्यांनी ट्रम्प यांना सांगितलं.
चाकूर शहरात येणारा रस्ता बंद, सत्यसाई रोड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरूचाकूर शहरालगत असलेल्या झिरो पॉईंट परिसरात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने महत्त्वाची उपाययोजना करत शहरात थेट येणारा रस्ता बंद केला आहे. बुधवारी (ता.१७) दुपार पासून सर्व प्रकारची वाहतूक सत्यसाई रोडवरील उड्डाणपुलावरून वळविण्यात आली असून या निर्णयामुळे अपघातांची मालिका रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच लातूररोड येथे रस्त्यासाठी पर्याय शोधण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
Gondia Live: गोंदियात पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलागोंदियात उकड्यापासून नागरिक हैराण झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यच्या पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. गोंदिया जिल्ह्यात मान्सून देखील उशिरा दाखल होणार आहे. हवामान खाते आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
Jejuri Live: अवैध दारू विक्रीविरोधात शिवरीकर ग्रामस्थ आक्रमकअवैध दारू विक्री आणि अतिक्रमणाच्या वाढत्या समस्येविरोधात शिवरी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांची भेट घेत अवैध दारू विक्रीसंदर्भातील पुरावे सादर केले.
Nashik Live: नाशिकमध्ये अखेर शनिवारपासून पाणीकपात लागूनाशिकमध्ये शनिवारपासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दर शनिवारी आता पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जून जुलै महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीची निर्णय घेतला गेला आहे. जलसंपदा सचिव एकनाथ डवलेंच्या पत्रानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने (TCA) चित्रपट अभिनेते विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच क्रिकेटपटू तिलक वर्मा, अंबाती रायडू आणि मोहम्मद सिराज यांना कायदेशीर नोटिसा बजावल्यातेलंगणा क्रिकेट असोसिएशनने (TCA) चित्रपट अभिनेते विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच क्रिकेटपटू तिलक वर्मा, अंबाती रायडू आणि मोहम्मद सिराज यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G-7 शिखर परिषदेदरम्यान जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमधील या वर्षातील ही दुसरी भेट आहे.
वायगाव-निपाणी परिसरातील नागरिकांची महावितरणविरोधात जोरदार निदर्शनेवाढीव वीज बिले आणि स्मार्ट मीटर यांचा निषेध करण्यासाठी वायगाव व निपाणी येथील ग्रामस्थांनी वायगाव वीज उपकेंद्रावर धडक देत जोरदार आंदोलन छेडले. या वेळी नागरिकांनी वाढलेल्या वीज बिलांची होळी करून आपला संताप व्यक्त केला. स्मार्ट मीटरमुळे अवाजवी बिले आकारली जात असल्याचा आरोप करत, ‘मीटर बदला आणि वीज बिले कमी करा, अन्यथा आम्ही वीज बिले भरणार नाही’, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला. महावितरण कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून जुन्या मीटरची पुनर्बांधणी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.
Shahapur Live: भातसा धरणातील पाणीसाठ्यात घटपावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने आणि प्रचंड उकाड्यामुळे शहापूर परिसरात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. येथे तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. याचा परिणाम जलाशयांच्या पाणीसाठ्यावर होत असून पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. सध्या भातसा धरणातील पाणीसाठा केवळ 31 टक्क्यांवर आला असून, आगामी काळात गंभीर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sanjay Deshmukh: खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्तसंजय देशमुख शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चांमुळे घराबाहेर पोलीस तैनात
देशमुखांच्या संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा;निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली
शिवसेना ठाकरे गटात खळबळ; खासदार संजय देशमुखांच्या घरासमोर पोलिसांचा पहारा
शिंदेसेनेत जाण्याच्या चर्चांदरम्यान संजय देशमुखांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त.
Bhimashankar Live: भीमाशंकर मंदिरात आता दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत मोफत दर्शनभाविकांसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय
उद्यापासून भीमाशंकर मंदिर सकाळी ७ ते ११ पर्यंत मोफत दर्शन असणार
भीमाशंकरला आता तत्काळ दर्शनही घेता येणार
१५ जून पासून भीमाशंकर दर्शन सुरू झाले आहे.
गेले काही महिने मंदिर कामासाठी बंद होते.
Pune News: पुणे PMRDAकडे शासकीय जमीन विनामूल्य हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला जिल्हा परिषदेचा विरोधपुणे पीएमआरडीएकडे जिल्ह्यातील दोन हजार ९४.३९ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला जिल्हा परिषदेने विरोध केलाय.जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी भूमिका घेतली आहे.या पार्श्वभूमीवर हवेली, मुळशी, दौंड, भोर, मावळ, पुरंदर, शिरूर आणि खेड या आठ तालुक्यांतील ग्रामपंचायतींमधून ग्रामसभांमध्ये विरोधाचे ठराव मंजूर करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे.जगदाळे यांनी जिल्हा परिषद सदस्यांना पत्र पाठवून आपल्या गटातील ग्रामपंचायतींकडून शासनाकडे पुनर्विचाराची मागणी करणारे ठराव तातडीने मंजूर करून पाठविण्याचे आवाहन केले आहे.नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पीएमआरडीएच्या विकासकामांसाठी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र,या प्रक्रियेत ग्रामपंचायतींच्या ताब्यातील गायरान जमिनींचाही समावेश असल्याने जिल्हा परिषदेने त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भात मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जगदाळे यांनी निवेदन देऊन या निर्णयाचा पुनर्विचार करून गायरान व सार्वजनिक वापराच्या जमिनी हस्तांतरणातून वगळाव्यात अशी विनंती केली होती.
Dombivli News: डोंबिवलीत लिफ्टच्या वादातून राडा, शेजाऱ्यांकडून बेदम मारहाणडोंबिवलीतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये लिफ्टच्या वीजबिलाच्या वादातून तणाव निर्माण होऊन एका रहिवाशाला शेजाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे.
Shirdi News: शिर्डीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक, गद्दार वाकचौरेंना धडा शिकवू - शिवसैनिकशिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करत शिंदे सेनेत विलीन झाल्याचं जवळपास निश्चित झालयं.. या खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा देखील समावेश आहे.. वाकचौरे यांच्या भूमिकेमुळे शिर्डीतील ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येतोय.. 2014 साली वाकचौरे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले होते.. त्यांना पुन्हा पक्षात घेऊन नका अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली होती, मात्र साईबाबांची शपथ घेतल्याने त्यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरेंनी वाकचौरेंना उमेदवारी दिली.. आता वाकचौरे यांनी ठाकरेंशी पुन्हा गद्दारी केली असून, त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवू अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.. शिर्डीतील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी..
Pune News: पुणे साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला हिरवा झेंडापुणे साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार
आजपासून पुणे ते शिर्डी थेट रेल्वे सेवा सुरू
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर उपस्थित
मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित
Pune Live : खासदार ओमराजे निंबाळकर पुणे विमानतळावरून बाहेरमाध्यमांना टाळून ओमराजे निंबाळकर दुसऱ्या दाराने पुणे विमानतळाच्या बाहेर
तब्बल 3 तास ओमराजे निंबाळकर पुणे विमानतळाच्या व्हि आय पी लाउंज मध्ये बसून होते
दिल्लीतून आल्यावर गेल्या तीन तासांपासून ओमराजे निंबाळकर पुणे विमानतळावर थांबून होते.
Solapur live : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी तयारी पूर्णउद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मतपत्रिका, मतदान पेटी आणि इतर साहित्य घेऊन पोलिंग पार्टी मतदान केंद्राकडे रवाना
3 पोलीस कर्मचारी, 1 बंदूकधारी पोलिसांच्या सुरक्षेत मतदान साहित्य घेऊन मतदान कर्मचारी रवाना
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी 615 मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत
मतादानासाठी सोलापूर जिल्ह्यातील 6 ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत
Mumbai live : लिफ्टच्या वादातून राडा,शेजाऱ्यांकडून बेदम मारहाणडोंबिवलीतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये लिफ्टच्या वीजबिलाच्या वादातून तणाव निर्माण होऊन एका रहिवाशाला शेजाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
MLA Mauli Katke Live : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावाशिवसेनेतील दुसऱ्या फुटीला पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचणारी चुकीची माहिती आणि तळागाळातील कार्यकर्त्यांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे खतपाणी मिळाल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांनी केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असतानाही प्रशासकीय दिरंगाईमुळे लोकप्रतिनिधींना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
Dharashiv Live : ओमराजे निंबाळकरांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने धाराशिवमध्ये ठाकरे गट आक्रमकओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांमुळे धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवसैनिकांनी इशारा देत म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना आमदार आणि दोन वेळा खासदार होण्याची संधी दिली. अशा परिस्थितीत शिवसेनेसारख्या मातृसंस्थेला सोडून जाणे वेदनादायी ठरेल. पक्षांतर केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून ठाकरे गट अशा घडामोडी कदापि सहन करणार नसल्याचे शिवसैनिकांनी स्पष्ट केले.
Buldhana Live : 15 दिवसांनी फक्त तासभर पाणी; बुलढाण्यात हजारो महिलांचा घागर मोर्चाबुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. तब्बल 15 दिवसांनी केवळ एक तास पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ हजारो महिला आणि पुरुषांनी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढला. संतप्त महिलांनी रिकाम्या घागरी मुख्याधिकाऱ्यांच्या हाती देत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि तात्काळ नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली.
Maharashtra Live : महाविकास आघाडीत खळबळ? ठाकरे गटानंतर तुतारी गटातील खासदारांमध्येही अस्वस्थतामहाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाच्या एका खासदारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी गटातील काही खासदारांमध्येही अस्वस्थता असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील खासदारांमध्ये चलबिचल वाढल्याचे बोलले जात आहे.
Sambhajinagar Live इम्तियाज जलील यांच्या विधानाला ठाकरे गटाचा पाठिंबा, देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोपऑपरेशन टायगर आणि लोकशाही धोक्यात येत असल्याच्या इम्तियाज जलील यांच्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांवर दबाव टाकून आणि विविध प्रकरणांची भीती दाखवून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांसह संबंधित पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. या भूमिकेला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला असून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलील यांच्या मताशी सहमती दर्शवत सध्या देशात हुकूमशाहीचे वातावरण असल्याचा आरोप केला.
Mumbai Live २०२९ नंतर देशात निवडणुका होणार नाहीत, इम्तियाज जलीलांचा गंभीर दावा२०२९ नंतर पुन्हा सत्ताधारी पक्ष सत्तेत आला तर देशात निवडणुका होणार नाहीत, असा गंभीर दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. विरोधी पक्षातील खासदार आणि आमदारांना धमक्या तसेच पैशांचे आमिष दाखवून सत्तेत सामील केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा घडामोडींमुळे देशातील लोकशाही धोक्यात येत असल्याचे ते म्हणाले. पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत सत्ताधारी पक्ष विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Kabul Live अफगाण जनतेसाठी भारताकडून पुन्हा पाच टन अत्यावश्यक औषधांची मदतभारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पुन्हा पाच टन अत्यावश्यक औषधांचा साठा पाठवत मानवतावादी मदतीची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. अफगाण जनतेच्या आरोग्य आणि कल्याणासाठी भारत सातत्याने मदतीचा हात पुढे करत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
Nashik Live पाणीकपातीचे संकट गडद; गंगापूर धरणात केवळ ३३ टक्के पाणीसाठा, आठवड्यातून एक दिवस कपातीची शक्यतामॉन्सून लांबल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे जलसाठ्याचे वेगाने बाष्पीभवन होत असल्याने नाशिककरांवरील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो सध्याच्या वापरानुसार फक्त १३ ऑगस्टपर्यंतच पुरेल, त्यामुळे महिनाअखेरपर्यंत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पुढील आठवड्यापासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्येही केवळ २३ टक्के पाणीसाठा उरला असून उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाऊस आणखी लांबल्यास दुष्काळाची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Jaisalmer Live : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला राजस्थान गुप्तचर विभागाकडून अटकपाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या जैसलमेरमधील एका व्यक्तीला राजस्थान गुप्तचर विभागाने अटक केली आहे. या आरोपीला जयपूरमधील न्यायालयात आणण्यात आले आहे.
Delhi Live : पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशनात संसदेत मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे विधेयक मंजूर होईलतेलंगणा भाजप नेते प्रकाश रेड्डी म्हणाले, "बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर, पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशनात संसदेत मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे विधेयक मंजूर होईल, अशी आशा आहे."
Shivsena UBT :आमदार खासदार म्हणजे पक्ष नव्हे : अरविंद सावंतमहाराष्ट्रात सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरवर पत्रकार परिषदेत अरविंद सावंत यांनी मांडलं मत आमदार खासदार म्हणजे पक्ष नाही, कार्यकर्ता म्हणजे पक्ष - अरविंद सावंत संविधानाशी छेडछाड सुरु आहे - अरविंद सावंत
Operation Tiger : घडणार आहे ते घडणारच; ऑपरेशन टायगरवर भास्कर जाधवांची प्रतिक्रियारत्नागिरी - जे घडणार आहे ते घडणारच आहे - भास्कर जाधव हेही दिवस निघून जातील पण त्यासाठी आपल्याला कार्यक्रम हाती घ्यावा लागेल काही निर्णय घ्यावे लागतील, काही भूमिका ठरवाव्या लागतील उद्धव साहेब डरो मत, चिंता करू नका-- भास्कर जाधव अफवांची राळ गेले वर्ष दीड वर्ष सुरू आहे
Kolhapur Live: कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलनप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे काल शुकशुकाट होता. बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाज ठप्प राहिले होते. दरम्यान कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, कराड, फलटण कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
Pune Live: शिक्रापुरात पीएमपीएमएल बसची टेम्पोला जोरदार धडकशिक्रापुर परिसरात पीएमपीएमएल बस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघाताने एकच खळबळ उडाली. बसच्या जोरदार धडकेनंतर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Politics Live: भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलनशरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची थट्टा करणार्या भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पंढरपूरयेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी निषेध बॅनरला पायाने तुडवून आंदोलन केले.
Comedian Pranit More : ‘३७० बिर्याणी’ प्रकरणी काॅमेडियन प्रणित मोरेसह हिमांशू विरुद्ध गुन्हा दाखलगुरुग्राम पोलिसांनी ‘३७० बिर्याणी’ (370 Biryani) प्रकरणात काॅमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तपासात सहकार्य करण्यासाठी नोटिसा बजावल्या असून, संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनाही वादग्रस्त व्हिडिओ तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९४, ३५३(३), ७५(२) आणि ७५(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक परशराम कामण्णा रेमानिचे (वय ५३, रा. वर्षानगर) यांनी उजळाईवाडीतील एका लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. आर्थिक कारणातून ही आत्महत्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक रणजित पाटील यांनी सांगितले.
Ravindra Chavan : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज येणार रत्नागिरीत; ठाकरे गटातील नेत्यांचा पक्षप्रवेशरत्नागिरी : भाजपने जिल्ह्यात पक्षबांधणीच्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या असून, विकासकामांसाठी निधी सिंचनही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आज (ता. १७) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांचीही बैठक घेणार आहेत. या दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून काहींचा प्रवेश होणार आहे.
Kolhapur News : महापालिकेच्या नोटिसांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी; आमदार अमल महाडिक यांचे पत्र व्हायरलकोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील बांधकामे नियमित करण्याबरोबरच महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत आमदार अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली मागणी व त्यावर उपमुख्यमंत्र्यांचा शेरा, असे पत्र आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यातून उलटसुलट चर्चा शहरात सुरू झाली आहे. दरम्यान, महापालिकेने बांधकामे पाडण्याबाबतच्या नोटिसांविरोधात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवर आज (ता. १७) सुनावणी होणार आहे. त्यावर बांधकामांवर कारवाई होणार की, पुढे जाणार हे ठरणार आहे.
Kolhapur News : जिल्हाधिकाऱ्यांनी केली अंबाबाई मंदिराची पाहणी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावाकोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अंबाबाई मंदिराची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवार (ता. १९) व शनिवार (ता. २०) या दिवशी ड्रोन उड्डाण व चित्रीकरण करण्यास प्रतिबंध केला आहे. कोल्हापूर, इचलकरंजी शहरात हा प्रतिबंध असेल.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या आमदारांची 22 जूनला बैठकमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीपाठोपाठ आता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे २२ जून रोजी पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक मंत्रालयासमोरील ‘शिवालय’ येथे होणार आहे. पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या बैठकीसंदर्भात सर्व आमदारांना पत्र दिले आहे.
Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार दिल्लीत? ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला राज्यात उधाणमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबविले जात असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार आज (ता. १७) दिल्लीत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे वृत्त पसरल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Drinking Water Policy : ग्रामीण भागासाठी पेयजल धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ निर्णयLatest Marathi Live Updates 17 June 2026 : राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या ‘महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६’ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यात राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन २.० मधील योजनांच्या देखभाल दुरूस्तीसाठी सर्वंकष आराखडा तयार केला जाणार असून या धोरणांतर्गत राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकरिता पाणीपुरवठ्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.