T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना
esakal June 18, 2026 03:45 AM

महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला संघाने नेदरलँड्स महिला संघाविरुद्ध बुधवारी ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. पण असे असले तरी हा सामना सुरू असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताची प्रमुख गोलंदाज श्रेयंका पाटीलला गंभीर दुखापत झाली आहे.

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही कमाल

झाले असे की भारतीय संघाने दिलेल्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नेदरलँड्स संघ उतरला होता. त्यांनी सलामीची फलंदाज हिदर सीगर्सची विकेट ५ व्याच षटकात २१ धावांवर गमावली होती. त्यानंतर ६ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी श्रेयंका पाटील आली.

तिने पहिला चेंडू फिबी मोकनबोरला टाकला. फिबीने खेळलल्या शॉटवर श्रेयंका चेंडू अडवायला गेली, पण चूकीच्या पद्धतीने पडली. तिचा पायाचा घोटा मुरगळला. त्यामुळे तिला प्रचंड वेदना झाल्याने ती तशीच मैदानावर बसली. त्यामुळे भारताच्या इतर खेळाडू तिच्या भोवती जमा झाल्या. लगेचच फिजिओही मैदानात आले.

काहीवेळ तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर मात्र मैदानात स्ट्रेचर मागवण्यात आले. श्रेयंकाला पायावर उभंही राहता येत नव्हतं. तिला नंतर स्ट्रेचरवरून माघारी नेण्यात आलं. त्यामुळे उर्वरित ६ व्या षटकातील गोलंदाजी शफाली वर्माने केली.

दरम्यान, तिची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप भारतीय संघाकडून सांगण्यात आले नाही. परंतु, सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने माहिती दिली की सध्या तिला काही स्पष्ट माहिती नाही, पण वैद्यकीय टीम तिच्यावर उपचार करत आहेत.

Women's T20 World Cup: गतविजेत्या न्यूझीलंडचा धुव्वा उडवत श्रीलंका चमकली; इंग्लंडने आयर्लंडला नमवले पण 'या' मोठ्या धक्क्याने खळबळ!

भारताचा विजय

या सामन्यात नेदरलँड्सचा संघ १७.३ षटकात ११४ धावांवर सर्वबाद झाला. सीगर्सव्यतिरिक्त फिबी (१५), कर्णधार बॅबेट डी लीड (२८) आणि स्टेर कालिस (१८) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली. भारताकडून नंदिनी शर्माने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. शफाली वर्माने ३ विकेट्स घेतल्या.

त्याआधी भारताने २० षटकात ५ बाद २०९ धावा केल्या होत्या. भारताकडून स्मृती मानधनाने ७४ धावांची खेळी केली, शफाली वर्माने ५५ धावांची खेळी केली. जेमिमाह रोड्रिग्सने १९ आणि रिचा घोषने नाबाद २० धावा केल्या. दीप्ती शर्माने नाबाद १० धावा केल्या. नेदरलँड्सकडून कॅरोलिन डी लँगने २ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.