अॅमेझॉनने १०० हून अधिक विशेष अर्बन फुलफिलमेंट सेंटर्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा एक महत्त्वपूर्ण विस्तार असून याद्वारे अॅमेझॉन नाऊवर आधीच उपलब्ध असलेल्या हजारो जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त चार पटीने अधिक उत्पादनांचे पर्याय ग्राहकांना मिळतील. प्राइम डे २०२६ च्या आधी सुरू होणारे हे सेंटर्स ग्राहकांना किराणा माल, पर्सनल केअर, फॅशन व सौंदर्य उत्पादने, लहान घरगुती उपकरणे, लहान मुलांची उत्पादने (बेबी प्रॉडक्ट्स), पाळीव प्राण्यांचे साहित्य आणि हेल्थकेअर सप्लिमेंट्स यांसारख्या गोष्टींसोबत कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने, शूज, लगेज, घड्याळे, वायरलेस डिवाईसेस, म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्स फर्निचर फक्त काही मिनिटांत घरपोच उपलब्ध करून देतील.
या अर्बन फुलफिलमेंट सेंटर्सची सुरुवात अॅमेझॉन नाऊच्या आधी घोषित केलेल्या १०० शहरांमधील १,००० हून अधिक मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्सच्या विस्तारावर आधारित आहे. जलद डिलिव्हरीचा वेग कायम ठेवत उत्पादनांचे पर्याय लक्षणीयरित्या वाढवण्यासाठी या पायाभूत सुविधांचा नवा स्तर जोडण्यात आला आहे. ही सेंटर्स प्रामुख्याने बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील.
Citroen Electric Car: ईव्ही क्षेत्रात सिट्रोएनचा मोठा दाव! जास्त फीचर्ससह परवडणारी E-C3X लॉन्च; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंम्मत“ग्राहक Amazon.in वर उपलब्ध असलेल्या डिलिव्हरीचा वेग, सोयीसुविधा आणि उत्पादनांच्या विविध पर्यायांचे कौतुक करतात. आम्ही अॅमेझॉन नाऊचा विस्तार करत असताना विविध श्रेणींमध्ये ग्राहकांना अधिक व्यापक पर्याय, उत्तम मूल्य आणि जलद डिलिव्हरी देण्यावर आमचा भर कायम आहे. गेल्या १३ वर्षांत तंत्रज्ञान, पायाभूतसुविधा आणि कर्मचारीवर्गामध्ये आम्ही केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे हे शक्य झाले आहे. या गुंतवणुकीने आम्हाला प्रगत तंत्रज्ञान, एआयवर आधारित इन्व्हेंटरी प्लॅनिंग, मागणीचा अंदाज आणि अत्यंत सुव्यवस्थित ऑपरेशन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या जोडीने भारतातील सर्वात सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह नेटवर्क उभारण्यास मदत केली आहे.
अर्बन फुलफिलमेंट सेंटर्सच्या माध्यमातून आम्ही आमचा माल (इन्व्हेंटरी) ग्राहकांच्या अधिक जवळ आणत आहोत, ज्यामुळे आमच्या विक्रेत्यांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या विस्तीर्ण श्रेणीतील उत्पादनांची जलद डिलिव्हरी करणे शक्य होईल. यामुळे ग्राहकांना अॅमेझॉन नाऊवर पूर्वीप्रमाणे सोयीसुविधा आणि योग्य मूल्य मिळत राहील,” असे अॅमेझॉन इंडिया, एपीएसी, मिडल ईस्ट, आफ्रिका आणि तुर्कियेचे ऑपरेशन्सचे व्हाईस प्रेसिडेंट अभिनव सिंग म्हणाले.
Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधाअर्बन फुलफिलमेंट सेंटर्स ही मोठ्या आकाराची केंद्रे आहेत, जी मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर नेटवर्कची क्षमता अधिक वाढवतात आणि ग्राहकांच्या घरापर्यंत अवघ्या काही मिनिटांत ४ पटीने अधिक उत्पादनांचे पर्याय उपलब्ध करून देतात. हा जलद विस्तार म्हणजे अॅमेझॉनच्या २,८०० कोटी रुपयांहून अधिक (जवळपास ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) गुंतवणुकीचा भाग आहे, ज्याचा उद्देश आपल्या डिलिव्हरी भागीदारांच्या (असोसिएट्स) सुरक्षितता, आरोग्य आणि आर्थिक कल्याणाच्या उपाययोजनांना अधिक प्रबळ करणे आणि आपल्या ऑपरेशन्स नेटवर्कला दृढ करणे हा आहे.
या प्रयत्नांचा भाग म्हणून अॅमेझॉनने आश्रय केंद्रे देखील स्थापन केली आहेत. ही केंद्रे डिलिव्हरी करणाऱ्या सर्व भागीदारांसाठी, ते कोणत्याही कंपनीसाठी काम करत असले तरीही, विश्रांतीसाठी समर्पित सुविधा आहेत. जास्त गर्दीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या केंद्रांमध्ये वातानुकूलित आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, चार्जिंग स्टेशन्स आणि प्रथमोपचार किट्स यांसारख्या सुविधा पुरवल्या जातात. अॅमेझॉनने नुकतेच २०२६ मध्ये या आश्रय नेटवर्कचा विस्तार १०० वरून २५० केंद्रांपर्यंत करण्याची योजना जाहीर केली आहे.
Lava SHARK 2 5G मोबाईल लाँच! 6000mAh बॅटरी + 120Hz डिस्प्लेचा जबरदस्त फोन; बजेट सेगमेन्टमध्ये दबदबा, किंमत फक्त ₹11,999Amazon.in हे एकमेव मार्केटप्लेस आहे, जे संपूर्ण भारतातील ग्राहकांना त्यांच्या गरजेच्या वेळी उत्पादनांचा सर्वात मोठा पर्याय उपलब्ध करून देते, ज्यामध्ये हजारो उत्पादने अवघ्या काही मिनिटांत किंवा काही तासांत १० लाखांहून अधिक उत्पादने त्याच दिवशी, ४० लाखांहून अधिक उत्पादने दुसऱ्या दिवशी आणि इतर लाखो उत्पादने अमर्याद, मोफत व जलद प्राइम डिलिव्हरीद्वारे घरपोच दिली जातात.