कॉफीप्रेमींनो, एकदा तरी ट्राय करा संत्र्याचा रस आणि कॉफीचा हटके कॉम्बो! लगेच नोट करा रेसिपी
esakal June 19, 2026 10:45 AM

आजकाल सोशल मीडियावर ऑरेंज ज्यूस कॉफीचा ट्रेंड जोरात सुरू आहे. संत्र्याच्या रसाची आंबट-गोड चव आणि कॉफीची किंचित कडवट चव यांचे मिश्रण अनेकांना आवडत आहे. काही जणांना हा अनोखा कॉम्बिनेशन खूप चविष्ट वाटतो, तर काहींना तो अजिबात पसंत पडत नाही. पण ज्या लोकांना सकाळी नाश्त्याला कॉफी प्यायला आवडते त्यांच्यासाठी कॉफीमध्ये काहीतरी टेस्ट करायची असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.

साहित्य
  • २ ताजी संत्री

  • १ शॉट एस्प्रेसो कॉफी किंवा १ मोठा चमचा स्ट्राँग इंस्टंट कॉफी

  • २ ते ३ बर्फाचे तुकडे

  • चवीनुसार साखर (ऐच्छिक)

कृती
  • संत्री सोलून त्यांचा ताजा रस काढून घ्या.

  • एका ग्लासमध्ये संत्र्याचा रस घाला.

  • त्यात एस्प्रेसो कॉफी किंवा तयार केलेली स्ट्राँग कॉफी मिसळा.

  • आवडत असल्यास बर्फाचे तुकडे घाला.

  • चवीनुसार साखर घालून नीट ढवळा.

  • थंडगार ऑरेंज ज्यूस कॉफी सर्व्ह करा.

  • © Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.