ICC Women's T20 World Cup 2026 India squad changes: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरूवात करणाऱ्या भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवार (१९ जून) पहाटे भारताची सर्वात मोठी भीती खरी ठरली. अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटील ( Shreyanka Patil ) घोट्याच्या अस्थिबंधाच्या दुखापतीमुळे महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडली आहे. बुधवारी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तिला ही दुखापत झाली, त्यानंतर तिला स्कॅनसाठी पाठवण्यात आले होते. तिच्या जागी लेगस्पिनर प्रेमा रावतची ( Prema Rawat ) निवड करण्यात आली आहे.
लीड्समध्ये गोलंदाजी करताना श्रेयंकाला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले होते. मिड-ऑनच्या दिशेने मारलेल्या चेंडूचा पाठलाग करताना तिच्या घोट्याला दुखापत झाली आणि वेदनेने ती विव्हळली. भारतीय संघाचे फिजिओथेरपिस्ट धावत आले, तेव्हा ती आपला उजवा पाय धरून बसली होती. तिला पायावर अजिबात वजन टाकता येत नव्हते, त्यामुळे स्ट्रेचरची गरज भासली.
जुलै २०२४ मध्ये बोट मोडल्यामुळे तिला त्या वर्षीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर तिच्या दोन्ही पायांना शिन स्प्लिंट्सचा त्रास झाला आणि मग तिच्या मनगटात स्ट्रेस रिॲक्शनची दुखापत झाली. त्यामुळे ती जवळपास एक वर्ष खेळापासून दूर राहिली.
Fact Check: तुमचा आदर करतो, पण...! वैभव सुर्यवंशीने खरचं संजय मांजरेकर यांना उलट उत्तर दिलं? पोस्ट व्हायरल, एकच खळबळआयसीसीने इव्हेंट टेक्निकल कमिटीने दुखापतीमुळे बदली खेळाडू घेण्याच्या भारताच्या विनंतीला मंजुरी दिली आहे. अनकॅप्ड रावतला राष्ट्रीय संघात पहिल्यांदाच बोलावण्यात आले आहे. तिने स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडून WPLचे दोन हंगाम खेळले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी आलेल्या भारत अ संघाची ती सदस्य होती.
२४ वर्षीय रावतने रायझिंग स्टार्स महिला आशिया चषकात भारत 'अ' संघाला विजेतेपद मिळवून देण्यात ४.२७ च्या इकॉनॉमीने आठ बळी घेतले होते. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान आणि नेदरलँड्सला हरवून भारताने आतापर्यंत २-० अशी आघाडी घेतली आहे. रविवारी मँचेस्टरमध्ये त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.