Vastu Tips : घरातील या चार ठिकाणी गुपचूप ठेवा या 4 गोष्टी, रात्रीत बदलेलं नशीब
Tv9 Marathi June 19, 2026 05:45 PM

Vastu Tips : दिवसरात्र मेहनत करूनही अनेकांच्या घरात आर्थिक अडचणी कायम राहतात. कितीही कमाई झाली तरी पैसा टिकत नाही, अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. वास्तुशास्त्रानुसार यामागे केवळ उत्पन्न किंवा खर्चाची कारणे नसून घरातील ऊर्जा आणि वस्तूंची मांडणीही कारणीभूत असू शकते. घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे काही सोपे वास्तु उपाय आर्थिक स्थैर्य मिळविण्यास मदत करू शकतात असे वास्तुतज्ज्ञ सांगतात.

वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला धनाचे अधिपती कुबेर यांचे स्थान मानले जाते. त्यामुळे घराची उत्तर दिशा स्वच्छ, मोकळी आणि अडथळामुक्त ठेवणे शुभ मानले जाते. या भागात जड फर्निचर, अनावश्यक सामान किंवा कबाड ठेवणे टाळावे. त्यामुळे आर्थिक संधी आणि सकारात्मक ऊर्जा घराकडे आकर्षित होते असे मानले जाते.

तसेच घरातील तिजोरी, लॉकर किंवा पैसे ठेवण्याची जागा दक्षिण-पश्चिम दिशेला असल्यास धनसंचय वाढतो अशी वास्तुशास्त्राची मान्यता आहे. ही दिशा स्थैर्य आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानली जाते.

लहान बदलांचा मोठा परिणाम

घरातील गळणारे किंवा सतत टपकणारे नळ त्वरित दुरुस्त करावेत. वास्तुनुसार पाणी हे धनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पाण्याची गळती म्हणजे पैशांचा अपव्यय होण्याचे संकेत मानले जातात.

याशिवाय घरात साचलेले जुने सामान, तुटलेल्या वस्तू किंवा वापरात नसलेले कबाड नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. अशा वस्तू वेळोवेळी हटविल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला मनी प्लांट लावणेही शुभ मानले जाते. वास्तुनुसार हा भाग ‘अग्निकोण’ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी हिरवेगार रोप लावल्याने आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होते, असे मानले जाते.

या चुका टाळा

घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर-पूर्व दिशा अत्यंत पवित्र मानली जाते. या ठिकाणी जड फर्निचर, स्टोअररूम किंवा कचरापेटी ठेवणे टाळावे. हा भाग नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवणे आवश्यक असल्याचे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

तसेच घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ, नीटनेटके आणि प्रकाशमान ठेवणे गरजेचे आहे. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.