उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर कुठे? अखेर तो फोटो आलाच पुढे, राजस्थान नाहीच, थेट..
Tv9 Marathi June 19, 2026 05:45 PM

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. शिवसेनेत ही मोठी उभी फूट आहे. उद्धव ठाकरे यांना थेट मोठा धक्का मिळाला. पक्षाकडून व्हिप जारी करूनही 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिली नाही. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा होती. यादरम्यानच शिवसेनेचे 6 खासदार फुटले आहेत. 19 जून रोजीच हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, हा पक्षप्रवेश काही दिवसांकरिता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे. 6 खासदारांसोबतच आमदारही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. राज्यातील राजकारणात पुढील काही दिवसात मोठा भूकंप येऊ शकतो. उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांच्याकडून हा मोठा धक्का देण्यात आला.

ओमराजे निंबाळकर यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याचे स्पष्ट आहे. पक्षाकडून व्हिप जारी केल्यानंतरही पक्षाच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर पोहोचले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ओमराजे निंबाळकर जाणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, 20 जूननंतर मी यासर्व गोष्टींवर बोलेल आणि माझी भूमिका जाहीर करेल.

ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीहून राजस्थानला गेल्याचे कळत होते. राजस्थानमध्ये त्यांना सुरक्षित स्थळी हलवल्याचे कळतंय. मात्र, नुकताच ओमराजे निंबाळकर दिल्ली किंवा राजस्थान येथे नसून ते पुण्यातच आहेत. आपल्या कुटुंबासोबत ओमराजे निंबाळकर पुण्यात आहेत. यादरम्यान त्यांचा पुण्यातील फोटोही पुढे आला. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली असली तरीही ते बाकी 5 खासदारांसोबत नाही तर पुण्यातच आहेत.

Omraje Nimbalkar

जगदीश हरताडे यांनी त्यांच्या फेसबुकवर नुकताच ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतच फोटो शेअर केला. हा फोटो पुण्यातीलच आहे. ओमराजे निंबाळकर पुण्यात असले तरीही ते ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचे सूत्रांकडून कळतंय. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.