राऊत तुमचं तोंड सांभाळा, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा, रामदास कदमांचा थेट इशारा
गणेश लटके June 19, 2026 11:13 PM

Ramdas Kadam :  संजय राऊतांना आम्ही गांभिर्याने घेत नाही. तुम्ही ऑपरेशन तुडवा असे म्हणाले पण आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय राऊतांना दिला. तुडवायची भाषा कुणाला करताय, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा. आम्ही गांडू नाही, तुमच्या घरात शिवसैनिक शिरतील आणि तोंड बंद करतील फोडून काढतील असेही रामदास कदम म्हणाले. राऊत तुमचं तोंड सांभाळा असे कदम म्हणाले. 

महाराष्ट्रातील खरा टायगर एकनाथ शिंदेच आहेत

उद्धवजी ही वेळ तुमच्यावर का आली? आमदार गेले आता खासदार गेले उद्या आमदार जातील, मुंबई महानगरपालिका आहे असे रामदास कदम म्हणाले. महाराष्ट्रातील खरा टायगर एकनाथ शिंदेच असल्याचे मत शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या वाटचालीतील 57 वर्षाचा मी साक्षीदार आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढाणण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. आज 60 वा वर्धापन दिन होत आहे. आज शिवसेना प्रमुख दोन दोन हातांनी एकनाथ शिंदेंना आशिर्दवाद देत असीतल. ते माझे विचार घेऊन पुढे घेऊन जात आहेत. त्यांचे विचार वाचवण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केल्याचे कदम म्हणाले. दोन तृतीअंश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले नसते तर काय झालं असतं? पण  शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वदानं तुम्हाल यश मिळाल्याचे रामदास कदम म्हणाले. 

श्रीकांत शिंदेंना युवासेनेचे प्रमुख करा, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस करुन टाका 

ऑपरेशन टायगरबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, मला डॉ. श्रीकांत शिंदेंचा अभिमान वाटतो. जेवढं तुमचं योगदान आहे, त्यापेक्षा श्रीकांत शिदेंचं अधिक योगदान आहे. त्यामुळं श्रीकांत शिंदेचं अभिनंदन. माझी आपणास विनंती आहे की श्रीकांत शिंदेंना युवासेनेचे प्रमुख करा, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस करुन टाका असे रामदास कदम म्हणाले. आम्हाला आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागायचं असे कदम म्हणाले.

संजय राऊतांमुळं उद्धव ठाकरेंना अधोगती सुरु झाली

संजय राऊतांमुळं उद्धव ठाकरेंना अधोगती सुरु झाली आहे. हे आपल्यासाठी चांगल आहे असे रामदास कदम म्हणाले. आमचा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे महणत रामदास कदम यांनी एखनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजीतो दात ही शिवसैनिकांची जात, असे म्हणत राऊत आमच्या नादी लागू नका असा इशारा रामदास कदम यांनी दिला. एकनाथ शिंदे दिवस रात्र काम करत आहेत असे कदम म्हणाले. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.