स्मार्टफोन आपल्याला प्रत्येकाच्या हातात पाहायला मिळतो. कारण स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मोबाईल आता कॉलिंग आणि मेसेज करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मिडिया स्क्रोलिंगपासून ऑनलाइन पेमेंट, गेमिंग, व्हिडीओ कॉल्स आणि ऑनलाईन मीटिंग्स या सारख्या अनेक कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे मोबाईलमध्ये इंटरनेट असणं खूप गरजेचं आहे. कारण त्या शिवाय या गोष्टी शक्यच नाही. मग यासाठी मोबाईलधारकांपुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे मोबाईल डेटा आणि दुसरा वायफाय.. पण वापरत असताना त्याचा थेट परिणाम तुमच्या फोनच्या बॅटरीवर होतो. पण दोन्ही पैकी सर्वाधिक बॅटरी कोण वापरतं? मोबाईल डेटा की वायफाय? चला जाणून घेऊयात…
मोबाईल डेटामुळे बॅटरी पटकन उतरते!मोबाईल डेटा वापरताना तुमची बॅटरी झटपट उतरते. त्यामुळे वायफायच्या तुलनेत मोबाईल डेटा वापरताना बॅटरी झपाट्याने उतरते. वायफाय नेटवर्कच्या तुलनेत 4जी किंवा 5जी नेटवर्क वापरल्याने बॅटरीवर परिणाम होते. तुमच्या बॅटरीचं चार्जिंगवर 50 ते 120 टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. म्हणजेच मोबाईल डेटा वापरला तर बॅटरीवर अधिक ताण येतो. त्यामुळे वायफाय कनेक्ट असेल तर फोनची बॅटरी जास्त टिकते. वायफाय राउटर फोनपासून काही पावलांच्या अंतरावर असतो. त्यामुळे बॅटरीवर ताण येत नाही. त्यामुळे मोबाईल डेटाच्या तुलनेत वायफाय कनेक्शनवर बॅटरीचा कमी वापर होतो.
मोबाईल डेटा जास्त बॅटरी वापरण्याचं कारण काय?मोबाईल डेटा वापरताना सर्वात पहिलं म्हणजे सिग्नलचं अंतर.. मोबाईल डेटा वापरताना टॉवरसोबत कनेक्ट करताा फोनची बॅटरी अधिक वापरतो. त्यामुळे बॅटरी पटापट उतरते. कारण टॉवर 100 मीटर किंवा त्यापेक्षा लांब असतो. त्यामुळे नेटवर्क मिळवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे बॅटरी उतरण्यास सुरूवात होते. दुसरं मोबाईल नेटवर्क कमकुवत असेल आणि मोबाईल डेटा सुरू असेल, तर फोन सतत मजबूत नेटवर्क सर्च करत असतो. त्यामुळे स्थिर नेटवर्क मिळत नाही तोपर्यंत सर्च सुरू राहतो. त्यामुळे बॅटरीवर ताण येतो.
बॅटरी वाचवण्यासाठी टीप्स