Maharashtra News Live Update: मनमाड पोट निवडणुकीत शिवसेना विजयी, समर्थकांचा जल्लोष
Saam TV June 21, 2026 04:45 PM
मनमाड पोट निवडणुकीत शिवसेना विजयी, समर्थकांचा जल्लोष

मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहाच्या दोन जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.प्रभाग क्रमांक दहा 'अ ' मधून माजी नगराध्यक्ष राभभाऊ पगारे यांनी 1555 मते मिळवित शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ज्योती वाघमारे यांचा 485 मतांनी पराभव केला तर दुसऱ्या सर्वसाधारण गटात शिवसेना शिंदे गटाच्या अलका अशोक रसाळ यांनी 1216 मते मिळवत ठाकरे गटाच्या शिफा जावेद शेख यांचा 440 मतांनी पराभव केला.विजयानंतर पगारे व रसाळ समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.

अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय

अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय. नगरसेवकांच्या 2 पोटनिवडणूक जागांवर भाजपने विजयी मिळवला. भाजपचे उमेश हरसुलकर यांनी 1401 मते मिळवत शिंदेशिवसेनेच्या रेश्मा चंदन यांचा पराभव केला.

भाजपच्या शारदा योगेश नाठे यांनी देखील 1706 मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. त्यांनी भारती प्रशांत नाठे यांचा 778 मते पराभव केला. दरम्यान, आता अकोट नगरपालिकामध्ये भाजपचा पक्षीय बलाबल संकेत 2 जागांहून वाढ झालीय. आता 11 जागाहून थेट 13 नगरसेवक भाजपचे या ठिकाणी असणार आहे.

खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाले असून खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

नांदेड जिल्ह्यात साडेचौदा हजार विद्यार्थी आज नीटची परीक्षा देणार

नीट फेरप्रवेश परीक्षेसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. नांदेड जिल्ह्यातील 42 परीक्षा केंद्रांवर सुमारे साडेचौदा हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी दीड या कालावधीत तपासणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दुपारी दोन ते सव्वा पाच या वेळेत परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यात एका नायब तहसीलदारांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

ऐतिहासिक बिबी का मकबरा मध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबत विविध संस्थांनीही जिल्ह्यात ठीक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात आबालवृद्धांनी सहभाग घेऊन योग सराव केला. बीबी का मकबरा येथे आयोजीत मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण उपस्थितांना दाखवण्यात आले. त्यानंतर सामूहिक योगासने, प्राणायाम आदींचा सराव करण्यात आला. यात शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ परीक्षा केंद्रांवर आज ४ हजार ७५१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पेपरफुटीच्या घटनेनंतर परीक्षेच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले असून प्रश्नपत्रिका कडेकोट पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आल्या. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे 14 केंद्रावर १०४ पोलीस बंदोबस्त ३५ आर्मी जवान तैनात आहेतकरण्यात आला आहे तर प्रश्नपत्रिकेच्या बॉक्स जवळ आर्मीचे जवान तैनात करण्यात आले आहे प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेत चौक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर परीक्षा केंद्रावर योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे

पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी केलेल्या रोपांना पाणी शिंपण्याची वेळ

तळकोकणातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट बघतोय. मात्र वरूनराजाने मागील 15 दिवस दडी मारली आहे. शेतात पेरलेल्या भाताची रोपे वाचवण्यासाठी तळकोकणातील शेतकऱ्याने शक्कल लढविलीय. पाऊसच नसल्याने विहीरच पाणी सिंचन करुन आपलं शेत वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर तळकोकणात पेरणी केली जाते. सुरूवातीला दोन ते तीन दिवस काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने विहिरीतून पाणी शिंपण्याची वेळ बळीराजावर आलीय. तळकोकणातील काही भागात तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची देखील वेळ येण्याची शक्यता आहे.

अकोला-वाशिम इंटरसिटी रेल्वेच्या डब्यातून खाली पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील कुंडलिक लक्ष्मण सावंत हे घरकुलाच्या कामानिमित्त मुंबईहून गावी येत होते.

परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर येथील झालेल्या घटनेची होणार चौकशी

परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर येथे काल झालेल्या दुर्दैवी घटनेत 23 भाविक जखमी झाले तर पाच भाविक मृत्यू पावले आहेत काल रात्री उशिरा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या ठिकाणी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे तर आज प्रांत अधिकारी खाली चौकशी करणार आहे.

योग दिनानिमित्त शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फिटनेस मंत्र; वयालाही मागे टाकणारी तंदुरुस्ती

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील रस्ते शेतशिवार आणि डोंगर पठाराव मोकळ्या वातावरणात नियमित व्यायाम, योगा आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या माध्यमातून त्यांनी निरोगी राहण्याचा संदेश दिला आहे.सकाळच्या आल्हाददायक वातावरणात वॉक, वॉर्म-अप आणि जिममधील कसून व्यायाम करताना आढळराव पाटील दिसत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी जपलेली तंदुरुस्ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, नियमित व्यायाम हाच निरोगी आयुष्याचा मंत्र असल्याचे ते कृतीतून दाखवून देत आहेत.

शिंदेसेनेच्या युवासेनेकडून ओमराजे यांना संरक्षण, मध्यरात्री कार्यकर्ते थेट ओमराजे यांच्या घराबाहेर

खासदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भेटायला आल्यानंतर तात्काळ एकनाथ शिंदेंच्या युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा ओमराजे यांच्या घराबाहेर जमले होते. विश्वगुरु माध्यमांसमोर अपशब्द वापरतात आणि मध्यरात्री या लोकांना भेटायची वेळ का आली? वेळ पडली तर आम्ही ओमराजे यांच्यासोबत धाराशिव ला जाऊ अशी भूमिका युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी व्यक्त केली.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

पवनराजे हत्याकांड निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदा ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

खासदार फुटी नंतर आज ओमराजे दुपारी ४ वाजता धाराशिव मध्ये कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार

काल रात्री उशिरा आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी भेट घेत मनधरणी केल्याची चर्चा

ओमराजे निंबाळकर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न

आज दुपारी बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्याशी बोलून ओमराजे निंबाळकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार..

यशवाडी येथील झालेल्या दुर्देवी घटनेनंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनास्थळी येत केली पाहणी

परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या सभा मंडप कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुंबईवरून येत उशिरा रात्री घटनास्थळी पाहणी केली आहे . घटनेमध्ये झालेल्या सर्व जखमींना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हॉस्पिटलमध्ये जात भेट दिली आहे व त्यांना धीर देण्यात आला आहे त्यांनी वेळी बोलताना सांगितले आहे की झालेली घटनाही दुर्दैवी आहे मंदिराची कामे संत गतीने सुरू आहे हे काम लवकर पूर्ण व्हायला पाहिजे होतं घटनेत मृत्यू पावल्या भक्तांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत राज्य सरकारकडून करण्यात आली आहे तर परभणीत यानंतर कोणतीही अशी घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाणार असे पालकमंत्री यांनी सांगितले

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.