Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर
Saam TV June 22, 2026 03:45 PM
  • आज सोन्याच्या दरात तब्बल ₹4,000 ची घसरण

  • २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ₹1,46,510

  • मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर सारखेच

  • चांदीचे दर आज स्थिर

Gold Silver Today Rates Update सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता! गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोनं चांदीच्या किंमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. मात्र आज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. शनिवारी सोन्याच्या किमतीत ६ हजारांनी घट पाहायला मिळाली, तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज ४ हजारांनी सोन्याचे दर गडाडले आहेत. तसेच चांदीचे दर स्थिर आहेत. आजचे २४K प्रमाणे १ तोळा सोन्याचे दर १,४६, ,५१० इतके आहे. जाणून घेऊया ताजे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)
  • १ ग्रॅम: आजचे दर १४,६५१

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१७,२०८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४६,५१०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,६५,१००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)
  • १ ग्रॅम: आजचे दर १३,४३०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०७,४४०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३४,३००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,४३,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)
  • १ ग्रॅम: आजचे दर १०,९८८

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८७,९०४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०९,८८०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,९८,८००

मुंबईसह पुणे आणि दिल्लीत कसे आहेत दर?

मुंबई पुण्यात सोन्याचे दर सारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटनर्स नुसार, मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,६५१, २२k सोन्याचे दर १३,४३० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,९८८ इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,६६६, २२k सोन्याचे दर १३,४४५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर ११,००३ इतके आहेत.

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

महिन्याच्या चौथ्या आठवड्यात चांदीचे दर स्थिर आहेत. आज चांदी १०० ग्रॅम प्रमाणे २५००० रुपये इतकी आहे. तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत सोन्यासोबतच चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २५०

  • ८ ग्रॅम चांदीचे दर २,०००

  • १० ग्रॅम चांदीचे दर २,५००

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २५,०००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,५०,०००

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.