Latest Marathi News Live Update : बीडमधील केज तालुक्यात रास्ता रोको आंदोलना दरम्यान रुग्णवाहिकेची तोडफोड
esakal June 23, 2026 06:45 PM
Beed Live: बीडमधील केज तालुक्यात रास्ता रोको आंदोलना दरम्यान रुग्णवाहिकेची तोडफोड

बीड जिल्ह्यातील केज मध्ये रास्ता रोको आंदोलना दरम्यान अज्ञाताकडुन रुग्णवाहिकेची तोडफोड

विलास घुले खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांसह ग्रामस्थांकडून तीन तासापासून महामार्ग रोखण्यात आला आहे.

Vardha Live: वर्ध्यात टीईटी अटीविरोधात शिक्षकांचे दंडवत आंदोलन; राष्ट्रपतींकडे हस्तक्षेपाची मागणी

टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) अटीविरोधात वर्धा जिल्ह्यात शिक्षकांनी अनोखे दंडवत आंदोलन करत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना आता टीईटी पात्रतेची अट लावण्यात येत असून, त्यामुळे २० ते २५ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

Sangali Live: सांगलीत पाऊसासाठी दानम्मा देवीला लोटांगण घालत तुकाराम बाबांचे साकडं

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर होवो,पाऊस पडो,असे साकडे सांगलीच्या जत तालुक्यातल्या गुड्डापूर येथील दानम्मा देवीला घालण्यात आले आहे. तुकाराम बाबा महाराज यांनी लोटांगण घालत दानम्मा देवी मंदिराला प्रदक्षिणा घलात, वरुण राजा प्रसन्न व्हो,असे साकडे घातले आहे.

Nandurbar Live : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

नंदुरबार जिल्ह्यात पहिल्याच पावसाने राज्य परिवहन महामंडळाच्या दुरुस्तीच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. नवापूर-नाशिक मार्गावरील एसटी बसमध्ये छतातून पाणी गळत असल्याने सुमारे 30 ते 35 प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. बसच्या खिडक्यांच्या फुटलेल्या काचांमधूनही वाऱ्यासह पावसाचे पाणी आत येत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. पावसाळ्यापूर्वी बस दुरुस्तीचे दावे करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

Live :  "चंद्रकांत पाटील पालकमंत्री असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती" - खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा गोरेंवर टोला

विधान परिषदेच्या निवडणुकीवर भाष्य करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. "चंद्रकांत पाटील सोलापूरचे पालकमंत्री असते, तर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असती," असे वक्तव्य करत त्यांनी गोरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या विधानामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Monsoon Update शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मान्सूनची एन्ट्री

पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागानेही मोसमी पाऊस दाखल झाल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र अद्याप पेरणीसाठी आवश्यक असा दमदार पाऊस झालेला नाही.

Jalgaon News जळगावात बंदी असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखुची खुलेआम विक्री

जळगावच्या एरंडोल शहरासह ग्रामीण भागात प्रतिबंधक गुटखा,सुगंधी तंबाखू व सुपारीची खुलेआमपणे विक्री केली जात असून अन्न व औषध प्रशासनासह पोलीस प्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.पिंपळकोठा येथील गुटख्याचा घाऊक विक्रेता प्रशासनाच्या नाकावर टिच्चून संपूर्ण तालुक्यात खुलेआमपणे गुटख्याचा पुरवठा करीत आहे.मध्यरात्री उशिरा पिंपळकोठा येथे दररोज ट्रकभर गुटखा विक्रीसाठी घाऊक विक्रेत्याकडे येत असतो.

धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आली कार्यकारिणी

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर २४ तासात जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारणी बरखास्त

धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त

Beed : भाजीपाला बाजारात वृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्याने मारहाण‌

Beed : भाजीपाला बाजारात वृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्याने मारहाण‌

नेकनूर येथील भाजीपाला बाजारात वृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्याने आणि विटाने मारहाण‌

नेकनूर पोलिसात आरोपी राजेश पवार विरुद्ध गुन्हा दाखल.

विजेचा तडाखा; आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथील २५० वर्षे जुने चिंचेचे झाड खाक

विजेचा तडाखा; आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथील २५० वर्षे जुने चिंचेचे झाड खाक

देवस्थानाच्या वैभवाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या झाडाच्या नुकसानीमुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असुन पहाटेच्या सुमारास झाडावर वीज कोसळताच आग लागली आणि काही तास झाड धगधगत राहिले.यावेळी टँकरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत ऐतिहासिक चिंचेचे झाड जळून खाक झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Trimbakeshwar Live अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

अधिक मासाच्या काळात त्र्यंबकेश्वर देवस्थानाला साडेसहा कोटी रुपयांहून अधिक देणगी प्राप्त झाली असून भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे देवस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. देणगी दर्शनातून ३ कोटी ६७ लाख रुपये, तत्काळ दर्शनातून १ कोटी ९० लाख रुपये, तर मंदिरातील दानपेटीतून १ कोटी ६ लाख रुपये जमा झाले. या कालावधीत ११ लाखांहून अधिक भाविकांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली असून देणगी दर्शन व्यवस्थेलाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Nashik Live: उत्तर महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा, SIT च्या तपासात धक्कादायक बाब समोर

नाशिक -

-

- एकाच जावक क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचं उघड

- तपासादरम्यान उपलब्ध कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती

- एकाच अधिकृत आदेशाखाली भिन्न नावांचे संच नोंदवल्याचं उघड

- घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

- तर SIT कडून आणखी संशयितांची चौकशी होण्याची शक्यता

Mumbai Rain : मुंबईच्या काही भागांत जोरदार पाऊस; माटुंगामधील सेनापती बापट मार्गावर पावसाच्या सरी

मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत.

Sulkud Water Supply Scheme : सुळकूड पाणी योजनेसाठी जनहित याचिका दाखल

इचलकरंजी : शहरासाठी दूधगंगा नदीवरील सुळकूड उद्‍भवातून मंजूर पाणी योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर २१ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. याबाबत माहिती याचिकाकर्ते अभिजित पटवा, महावीर कोल्हापुरे, उमेश पाटील, राजू कोन्नूर, सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Jharkhand News : झारखंडमध्ये वीज कोसळून ११ जणांचा मृत्यू

रांची : झारखंडमध्ये गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी वीज कोसळून तीन महिला आणि एका १० वर्षांच्या मुलीसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. खुंटी जिल्ह्यात चार, रामगडमध्ये दोन, तर लोहारदगा, देवघर, जामतारा, साहिबगंज आणि गिरिडीह जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात असल्याचे सांगण्यात आले.

Sindhudurg Yellow Alert : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट तर त्यानंतर ३० जूनपर्यंत दमदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे एल निनोने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांकरिता हा दिलासा आहे.

Nagpur News : नागपूरमधील मदरसा शिक्षकावर 10 अल्पवयीन मुलांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नागपूरमधील ताजबाग भागातील एका मदरसा शिक्षकावर 10 अल्पवयीन मुलांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलिसांनी दिली असून, आरोपी शिक्षक सध्या फरार आहे. मध्य प्रदेशातील एका १६ वर्षीय पीडित मुलाने मदरसा व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाचे नाव अताय रसूल ऊर्फ तालिफ (वय २६) असून तो आझाद कॉलनीचा रहिवासी आहे.

Jaipur News : पाकिस्तानमधील 'जैशे महंमद'संबंधी महिलेला अटक

जयपूर : पाकिस्तानमधील ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांशी संपर्क ठेवल्याप्रकरणी राजस्थान दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बबिता धाकड ऊर्फ खादिजा नावाच्या महिलेला अटक केली आहे. मूळची गंगापूर शहराची असलेली आणि सध्या जयपूरमध्ये राहणाऱ्या बबिताला देशविघातक घटकांशी असलेल्या संबंधांच्या माहितीनंतर ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती ‘एटीएस’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तिच्या मोबाइलच्या तपासणीत आक्षेपार्ह मजकूर आणि परदेशी प्रोफाइलच्या लिंक आढळल्या आहेत.

Kolhapur News : तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत नगरविकास विभागाची मंत्रालयात आज ऑनलाईन सुनावणी

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत पुढे ढकललेली ऑनलाईन सुनावणी आज (ता. २३) मंत्रालयात नगरविकास विभागाने ठेवली आहे. त्यामध्ये आयुक्त ऑनलाईन सहभागी होणार आहेत. त्यामुळे शासन या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Rain at Talwada Ghat : वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ढगफुटीसदृश पाऊस; शिऊर बंगला-नांदगाव मार्गावरील पूल गेला वाहून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाट परिसरात काल सायंकाळी ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शिऊर बंगला ते नांदगाव या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान असलेला पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Resignation of British PM Keir Starmer : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा

Latest Marathi Live Updates 23 June 2026 : लोकप्रियतेतील घट आणि पक्षांतर्गत विरोधानंतर ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजीनाम्याची अटकळ बांधण्यात येत होती. अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. येत्या काही आठवड्यांत नवीन नेत्याची निवड प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत नवा पंतप्रधान नियुक्त केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.